Photo Credit- Social Media सैफ अली खान हल्ला प्रकरणात फॉरेन्सिक अहवालामुळे पोलिसांना वेगळाच संशय
चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर जवळपास पाच दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मंगळवार २१ जानेवारी रोजी हा अभिनेता त्याच्या घरी परतला आहे. हल्ल्यानंतर तो उपचारासाठी लीलावस्थी रुग्णालयात पोहोचला आता अखेर अभिनेता घरी परतला आहे. सुमारे पाच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तो आज घरी पोहचला आहे. अभिनेत्याची प्रकृती सुधारत आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सैफ अली खानने चाहते आणि माध्यमांचे आभार मानले आहे. अभिनेत्याला हसताना पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या हल्ल्यात अभिनेता झाला होता जखमी
सैफ अली खानने हसून आणि हात हलवून चाहते आणि माध्यमांचे आभार मानले. १६ जानेवारी रोजी सकाळी हल्लेखोराने सैफ अली खानवर अनेक वार केले. अभिनेता गंभीर जखमी झाला. त्याच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले, जिथे त्यांच्यावर अनेक तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या हल्ल्यात सैफला तीन ठिकाणी दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हातात दोन जखमा, मानेच्या उजव्या बाजूला एक. याशिवाय पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. सध्या सैफ धोक्याबाहेर आहे. आज, अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा, त्यांच्या ‘सतगुरू शरण’ या निवासस्थानाजवळ कडक सुरक्षा व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Actor #SaifAliKhan reached his residence after he was discharged from Lilavati Hospital in Mumbai.
Saif Ali Khan was admitted there after being stabbed by an intruder at his residence, in the early morning of January 16. pic.twitter.com/QKIfGH1xqq
— ANI (@ANI) January 21, 2025
पाठीच्या कण्यातून तीक्ष्ण वस्तू काढली
सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेदरम्यान, डॉक्टरांनी त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकलेली एक धारदार वस्तू काढली. शस्त्रक्रियेनंतर, १७ जानेवारी रोजी सैफ अली खानला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर त्याला एका सामान्य खोलीत हलवण्यात आले. सुमारे पाच दिवसांनंतर, सैफला घरी पाठवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर अभिनेत्याला घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती.
Shraddha Kapoor: श्रद्धाने वडील शक्ती कपूरसह मुंबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून व्हाल चकित!
आरोपीला अटक केले
पोलिस चाकू हल्ल्याच्या घटनेचा प्रत्येक कोनातून तपास करत आहेत. रविवारी पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मदला ठाणे येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशचा नागरिक आहे आणि त्याने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. ३० वर्षीय शहजाद चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात घुसला. आणि त्यांच्यावर हल्ला केला. या बातमीनंतर अभिनेत्याचे चाहते चांगलेच चिंतेत होते. परंतु आता अभिनेत्याची तब्येत सुधारी असून, तो लवकरच कामाला सुरुवात करणार आहे.