(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूने अलीकडेच तिच्या ‘भूत बांगला’ या चित्रपटाशी जोडल्याबद्दल आनंद व्यक्त केला, पण यादरम्यान, ती आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. खरं तर, अलिकडच्याच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अभिनेत्रीने एका पुरूषासोबत बेड शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या अहवालानंतर, तब्बूने तिच्या टीमद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. या बातमीमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तब्बूच्या टीमने एक निवेदन जारी केले
तब्बूच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “प्रेस थांबा आता… अशा अनेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया हँडल आहेत ज्यांनी तब्बूच्या नावाने काही खोटी विधाने केली आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की तिने कधीही हे कोट्स दिले नाहीत. लोकांची दिशाभूल करत आहे.” नैतिकतेचे गंभीर उल्लंघन आहे.” असे अभिनेत्रीच्या टीमने सांगितले आहे. अभिनेत्रीसह टीम देखील मीडियावर चांगलीच संतापली आहे.
निवेदन जारी करून माफी मागण्याची मागणी केली
निवेदनात तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, त्यात म्हटले आहे की, “आम्ही मागणी करतो की या वेबसाइट्सनी बनावट कोट्स ताबडतोब काढून टाकावेत आणि माफी मागावी.” अभिनेत्रीच्या टीमने स्पष्ट केले आहे की अशा निराधार आणि बदनामीकारक बातम्या कलाकाराच्या प्रतिष्ठेला कलंकित करतात. भूल भुलैया २ नंतर आता अभिनेत्री लवकरच नव्या हॉरर कॉमेडी चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.
तब्बू लवकरच या चित्रपटात दिसणार आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अलिकडेच तब्बू ‘ड्यून: प्रोफेसी’ मधील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत होती. अभिनेत्रीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली की ती २५ वर्षांनंतर अक्षय कुमारसोबत ‘भूत बांगला’मध्ये दिसणार आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.