(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
अभिनेता जॅकी श्रॉफ सणाच्या वेळी इतरांच्या घरी रोषणाई निर्माण करणे हीच खरी दिवाळी मानतो. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात तो मुलगा टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे.हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आणि पात्रे रामकथेच्या मूळ कल्पनेशी प्रतीकात्मकपणे जोडलेली आहेत. ज्यामध्ये टायगरची भूमिका लक्ष्मणजींपासून प्रेरित आहे. एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने मुलगा टायगर आणि त्याच्या कुटुंबासोबत यावेळी दिवाळी कशी साजरी करणार हे शेअर केले आहे.
जॅकी श्रॉफ दिवाळी कशी साजरी करणार?
जॅकी श्रॉफसाठी यंदाची दिवाळी खास असणार आहे. त्याचा मुलगा टायगरसोबतचा सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीपूर्वीच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या तयारीबद्दल अभिनेता म्हणाला की, ‘खूप महत्त्वाचं शूटिंग असेल तर मी जाईन, नाहीतर घरी दिवाळी साजरी होईल. मी अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमात जाईन आणि तिथे मिठाई वाटेन, यापेक्षा मोठी दिवाळी काय असू शकते. उरलेला वेळ घरी पूजा असेल, जर मुलं (टायगर आणि कृष्णा श्रॉफ) शूटिंगमध्ये व्यस्त नसेल तर ते एकत्र बसून सकाळचा चहा घेतील आणि जेवतील. वेळ खूप वेगाने जातो. त्यामुळे कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा करण्याची संधी सोडू नका.’ असे त्यांनी सांगितले.
जॅकी श्रॉफ यांनी शेअर केली बालपणीची दिवाळी
आकाशात फटाक्यांचा प्रकाश पाहायचा बालपणीची दिवाळी आठवून जॅकी श्रॉफ म्हणाले की, ‘फटाके पेटवायला माझ्याकडे पैसे नसायचे, मी चाळीमध्ये राहत होतो. सर्व मुले महागडे फटाके फोडायचे, तेव्हा मी गच्चीवर बसून आभाळाकडे बघायचो त्या फटाकड्यांचा प्रकाश पाहायचो. त्यानंतर मी रात्री उशिरा जाऊन न जळलेले फटाके शोधून दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी वापरत असे. महाराष्ट्रात दिवाळीला प्रत्येक घरात चकली, लाडू, शंकरपाळ्या असे अनेक पदार्थ तयार केले जातात. जेव्हा मी साच्यातून गोल चकली बनवायचा तेव्हा मला मोठा कलाकार झालोय असे वाटायचे. ते सर्व पदार्थ आजही घरी बनवले जातात. हेच या उत्सवाचे सौंदर्य आहे. ही संस्कृती आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले.
आईसाठी घेतली होती खास भेट
अभिनेत्याने आईसाठी सोन्याचे नाणे खरेदी केले होत. जॅकी यांनी दिवाळीत पहिल्यांदाच सोन्याचे नाणे खरेदी केले होते. त्यांनी सांगितले की, त्यांनी त्याच्या आईसाठी सोन्याचे नाणे घेतले होते. वस्तू खरेदी करण्याचा हेतू आणि दृष्टीकोन खूप महत्वाचे आहे. सणासुदीला कोणाला तरी काहीतरी द्यायचे, असा विचार आधी प्रत्येकाच्या मनात आला पाहिजे. सोने-चांदी विकत घेण्यापेक्षा एखादी छोटी वस्तू घेऊन गरजूंना देण्याची कल्पना मोठी आहे. माता लक्ष्मी कामाने प्रसन्न होते, संपत्तीचे वाटप करण्याचाही हेतू असावा. आरोग्य आणि संपत्ती यात समतोल असायला हवा.’ असे देखील अभिनेत्याने सांगितले.
हे देखील वाचा – Bigg Boss 18: अविनाश मिश्राचा भयानक लूक पाहून प्रेक्षक संतापले, म्हणाले ‘त्याला घराबाहेर काढा…’
दिवाळी हा सणच आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा आहे. प्रत्येक घराघरात या सणाला लहानापासून ते मोठ्यांपर्येंत सगळ्यांचा किलबिलाट सुरु असतो. अभिनेता या वर्षीची त्यांची दिवाळी देखील दरवर्षी प्रमाणे आपल्या कुटूंबासोबत आणि मुलांसोबत साजरी करणार आहे.