Sonakshi Sinha (फोटो सौजन्य-Instagram)
बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह अत्यंत साध्या आणि बिनधास्त पद्धतीने पार पडला. या जोडप्याने नोंदणीकृत विवाह केला आणि एकमेकांसोबत नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नावरून सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला होता. कोणी या आंतरधर्मीय विवाहाचे समर्थन केले, तर कोणी विरोधात बोलले. त्याचबरोबर हे लग्न त्यांच्या कौटुंबिक मतभेदांमुळेही चर्चेत आले होते. असे देखील समोर आले. परंतु या दोघांचा एकमेकांच्या प्रेमावर विश्वास असल्यामुळे हे लग्न यशस्वी झाले.
सोनाक्षीने लग्नवाढदिवसाचे फोटो केले शेअर
सोनाक्षी सिन्हाने बराच काळ डेट केल्यानंतर झहीर इक्बालसोबत लग्न केले. 23 जून रोजी दोघांचे लग्न झाले. आता त्यांच्या लग्नाला एक महिना उलटून गेला असताना, सोनाक्षीने एका महिन्याच्या लग्नवाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने पुन्हा एकदा पती झहीरवरील प्रेम व्यक्त केले आहे. छायाचित्रे शेअर करण्यासोबतच अभिनेत्रीने या तिथे त्यांनी हा लग्नवाढदिवस साजरा केला त्या ठिकाणाचे महत्त्वही सांगितले आहे.
कधी झहीरसोबत स्विमिंग पूलमध्ये, तर कधी झाडाकडे पाहताना सोनाक्षीने झहीरसोबतचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना भरपूर आनंद होत आहे.
सोनाक्षीने या ठिकाणचे सौंदर्य सांगितले
फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “आम्ही आमच्या लग्नाचा एक महिना ते करून साजरा केला जे आम्हाला करायचे होते, या पुढे लिहिले की रिकव्हर! “ही जाहिरात नाही आणि कोणीही आम्हाला पोस्ट करण्यास सांगितले नाही, परंतु आम्हाला फिलीपिन्समधील सॅन बेनिटो यांचे सौंदर्य प्रदर्शित करायचे होते.” असे तिने या कॅप्शनमध्ये लिहिले.
सोनाक्षीने पुढे लिहिले की, “एका आठवड्यात आम्हाला सांगितले गेले की वेलनेस म्हणजे काय, तुमच्या शरीराच्या गरजा ऐका आणि तुमच्या मनाची काळजी घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात जागे होणे, बरोबर खाणे, वेळेवर झोपणे, डिटॉक्स उपचार आणि मसाज – हे सर्व एक नवीन भावना देते. असे तिने या मध्ये लिहिले.
चाहत्यांनी दिली पोस्टला प्रतिक्रिया
सोनाक्षी आणि झहीरचे फोटो पाहिल्यानंतर अनेक यूजर्सनी त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, ‘माशाअल्लाह, तुम्ही दोघेही आंधळ्या भक्तांच्या नजरेपासून सुरक्षित राहा.’ तर दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, ‘देव तुम्हाला आशीर्वाद देवो’ असे त्यांनी प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला.