(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड स्टार सनी लिओन सध्या सुट्टीवर आहे. सनी लिओनी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान, सनी लिओनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सुट्टीत सनी लिओनीने दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. सनी लिओनीने एका इंटिमेट समारंभात पती डॅनियल वेबरसोबत एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेताना दिसली आहे. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या दुसऱ्यांदा लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सनी लिओनी पांढऱ्या रंगाच्या गाऊन परिधान केला असून, डॅनियल वेबर पांढऱ्या सूट घातला आहे. दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये डॅनियल वेबर आणि सनी लिओनीची मुले देखील दिसत आहेत. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचे संपूर्ण कुटुंब पांढऱ्या रंगाच्या पोशाखात चमकताना दिसले. हे फोटो समोर येताच डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोक डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचा वेडिंग लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. डॅनियल वेबर आणि सनी लिओनी मालदीवमध्ये पुन्हा लग्न केले असून, हे दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. विशेष म्हणजे डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या मुलांनाही त्यांचे लग्न पाहण्याची संधी मिळाली म्हणून ते देखील फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत.
हे देखील वाचा – राजपाल यादव पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले अन् केले असे कृत्य… व्हिडिओ झाला व्हायरल!
लग्नाआधी डॅनियल वेबर आणि सनी लिओनी हेलोवीन सेलिब्रेट करताना दिसले होते. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीने या सेलिब्रेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचा लूक खूपच आकर्षित दिसत होता. सनी लिओनीने सध्या बॉलिवूडपासून अंतर ठेवले आहे. मात्र, सनी लिओन अनेकदा एमटीव्ही स्पिरिट्सविलामध्ये धमाल करताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना अभिनेत्री कित्येकदा दिसली आहे.
हे देखील वाचा – ‘राधा कृष्ण’ फेम सुमेध मुदगलकचा सेटवर अपघात, मोडले नाकाचे हाड, आता कशीय तब्येत?
कामाच्या आघाडीवर, सनी लिओनी ‘पेट्टा रॅप’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त सनी लिओन इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये देखील काम करणार आहे. प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांच्या आगामी ‘बॅडस रविकुमार’ या चित्रपटात तिचा सहभाग आहे. तिच्याकडे पाइपलाइनमध्ये शीर्षक नसलेला मल्याळम प्रकल्प देखील आहे. शिवाय, सनी ‘शेरो’ चित्रपटात देखील दिसणार आहे, या प्रकल्पाविषयी तपशील अद्याप गुंसमोर आलेले नाही. तिने नुकतेच 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘टेंट’साठी चित्रीकरण पूर्ण केले आणि आगामी वर्षात रिलीज होणारे आणखी दोन शीर्षक नसलेले चित्रपट ती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.