KGF 3 Film (फोटो सौजन्य- X अकाउंट)
प्रशांत नील हा साऊथ सिनेमाचा दिग्दर्शक आहे, ज्यांनी बॅक टू बॅक दोन हिट चित्रपट प्रेक्षकांच्या समोर आणले. एक ”KGF’ आणि ‘Salar’ हे त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेले सिनेमे आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर येताच खळबळ उडवून दिली. या दोन्ही चित्रपटाला चाहत्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. तसेच प्रेक्षकांना आता ‘KGF 3’ आणि ‘Salar 2’ च्या रिलीजची वाट पाहायला लागणार आहे. याचदरम्यान चित्रपट ‘KGF 3’ संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्याची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
‘KGF 3’ संदर्भात मोठी बातमी
यश हा साऊथ सिनेमाचा रॉकिंग अभिनेता मानला जातो. ‘KGF’ चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे आणि संवादांचे लोकांना वेड लागले होते. ‘KGF’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात यशचा संवाद – ‘हिंसा, हिंसा, हिंसा! ‘मला आवडत नाही, मी टाळतो,’ तो अजूनही लोकांच्या ओठावर आहे. KGF च्या तिसऱ्या भागात यशचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते पुन्हा एकदा उत्सुक आहे, आणि याचदरम्यान एक आनंदाची बातमी चर्चेत आली आहे. या चित्रपटात प्रशांत नील एक ट्विस्ट घेऊन येणार आहे. ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे.
या सुपरस्टारची होणार एन्ट्री
अजित कुमार ‘KGF 3’ मध्ये एन्ट्री करत असल्याचे सांगितले जात आहे. असे झाल्यास साऊथ सिनेप्रेमींसाठी हा एक मोठा ट्विस्ट असणार आहे. ‘गरुडा’ आणि ‘अधीरा’ या चित्रपटानंतर हा अभिनेता ‘KGF 3’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात अजित कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, चाहत्यांसाठी हा खूप आनंदायी ट्विस्ट ठरला आहे. अजित कुमारला प्रेक्षक खलनायकच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. यश आणि अजित कुमार या उत्कृष्ट नटांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
अजितकुमार यांनी प्रशांत नील यांची भेट घेतली
काही दिवसांपूर्वी अजित कुमारने दिग्दर्शक प्रशांत नील यांची भेट घेतली होती. दोघेही दोन चित्रपटांसाठी एकत्र काम करत आहेत अशी सध्या चर्चा सुरु आहे. डीटी नेक्स्टच्या रिपोर्टनुसार, कन्नड आणि तेलगूनंतर प्रशांत नील थेट तामिळमध्ये कथा बनवणार आहे आणि त्यात अजित कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे दोन चित्रपट असू शकतात. यापैकी एक ‘KGF 3’ असणार असून, दुसऱ्या चित्रपटाचे नाव अद्यापही स्पष्ट झाले नाही आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती होंबळे फिल्म्स अंतर्गत होणार आहे.