Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी ‘ही’ सुप्रसिध्द जोडी पुन्हा एकत्र; स्टार प्लसच्या “Tara”मालिकेतून भेटीला येणार

“Tara” च्या कथेने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असली तरी, या मालिकेची अजून एक खास गोष्ट म्हणजे टीव्हीवरील एक नॉस्टॅल्जिक जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र येत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 09, 2026 | 04:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्लसवर लवकरच “Tara” ही रोमँस आणि भावनांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका तारा आणि युवराज यांच्या प्रेमाच्या नव्या प्रवासाची हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या मालिकेत कृषल आहुजा युवराजच्या भूमिकेत तर कनिका कपूर तारा च्या भूमिकेत दिसणार आहेत.

“Tara” च्या कथेने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असली तरी, या मालिकेची अजून एक खास गोष्ट म्हणजे टीव्हीवरील एक नॉस्टॅल्जिक जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र येत आहे. गुरदीप कोहली आणि गिरीश सहदेव, ज्यांना प्रेक्षकांनी त्यांच्या पती-पत्नीच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीसाठी खूप प्रेम दिले होते, ते या मालिकेत पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

त्यांच्या आधीच्या जोडीला प्रेक्षकांनी त्यांच्या सहज मोहकतेसाठी, विनोदासाठी आणि भूमिकांमधील नैसर्गिकतेसाठी खूप पसंती दिली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहणे टीव्ही रसिकांसाठी आणि चाहत्यांसाठी नक्कीच आनंददायी ठरणार आहे.

या मालिकेत गिरीश सहदेव युवराजच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसतील. या भूमिकेत ते एका लक्षवेधी ट्रान्सफॉर्मेशनसह अधिक फिट लूक आणि नव्या ऑन-स्क्रीन अवतारात दिसणार आहेत. गुरदीप कोहलीदेखील कथानकात एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील ज्यामुळे कथेला अधिक खोली मिळणार आहे.

Sandokan ला 50 वर्षे पूर्ण; कबीर बेदी यांनी ‘सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये साजरा केला खास क्षण

जरी ते पुन्हा एकत्र दिसणार असले, तरी ‘तारा’मधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिलेल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिका साठी सगळेच उत्सुक आहे.

तरुण प्रेमकथेभोवती फिरणारा कथानक आणि परिचित चेहरे पुन्हा स्क्रीनवर परत येत असल्यामुळे “Tara” हा शो नक्कीच पाहण्यासारखा ठरणार आहे. तारा आणि युवराज यांच्या प्रेमकथेचा प्रवास कसा उलगडतो आणि गुरदीप कोहली व गिरीश सहदेव ही आवडती जोडी आपल्या नव्या पात्रांमधून कथेला कशी खास रंगत आणते, हे पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

Randeep Hooda ने चाहत्यांना केलं खुश; पत्नी सोबतचे रोमँटिक मॅटरनिटी फोटोशूट व्हायरल, लवकरच करणार छोट्या पाहुण्याचं स्वागत

मालिकेच्या कथेत तारा आणि युवराज यांची गोष्ट दाखवली जाणार असून ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. काळ जसजसा पुढे जातो, तसतशी त्यांची मैत्री प्रेमात बदलताना दिसते. सुरुवातीच्या प्रोमोमध्ये त्यांच्या उबदार आणि हृदयस्पर्शी केमिस्ट्रीमधून ही झलक पाहायला मिळते. मात्र, त्यांचा हा प्रवास सोपा नसणार आहे. दोघे खूप वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे त्यांच्या नात्यातील वर्गभेद ही एक मोठी अडचण ठरू शकणार का? त्यांचे प्रेम या आव्हानांवर मात करू शकेल का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी आणखी रंजक ठरणार आहे.

Web Title: The famous on screen couples that once ruled viewers hearts reunited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • tv serial

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.