फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : सोशल मीडियावर चर्चेत असलेला टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस १८ सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. बिग बॉस १८ च्या घरामध्ये रोज नवनवीन काही ना काही तरी मनोरंजक पाहायला मिळत आहे. दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी घरामध्ये एन्ट्री केल्यानंतर अनेक घरामधील नाती बदलली आहेत त्याचबरोबर अनेक नवी नाती घरामध्ये पाहायला मिळाली आहेत. त्याचबरोबर रजत दलाल आणि विवियन डीसेना यांच्यामधील वाद तर अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांच्यामधील दुश्मनी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.
आता त्यानंतर सोशल नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये बिग बॉस घरात नॉमिनेशनची प्रक्रिया पाहायला मिळत आहे. यामध्ये बिग बॉसने पोस्टमनची थीम ठेवली आहे. यामध्ये बिग बॉसने विवियन डीसेनाला पोस्टमनची भूमिका दिली आहे. यामध्ये इशा सिंहने दिग्विजयचे नाव घेतले आहे तर एलिस कौशिकने रजत दलालवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर वाइल्ड सदस्य कशिश कपूरने श्रुतिका अर्जुनला आपला निशाण बनवला आहे. यावेळी कशिश कारण सांगते की, नेहमी तिला जोरजोरात बोलण्याची गरज नाही. त्याचबरोबर ती एक मजबूत स्पर्धक आहे त्यामुळे पुढे जाऊन ती माझ्या अडचणी वाढवू शकते. त्यानंतर श्रुतिका अर्जुन येते आणि ती कशिश कपूरचे नाव घेते यावेळी श्रुतिका म्हणते की, त्यांना वाटत ना की मी खेळामध्ये त्यांना पुढे जाऊन अडचणींमध्ये टाकू शकते तर मी ती सवय त्यांना आतापासूनच लावते.
हेदेखील वाचा – जसलीन रॉयलचे ‘साहिबा’ पोस्टर आऊट; विजय देवरकोंडा आणि राधिका मदनची दिसणार अनोखी केमिस्ट्री!
पुढे त्यानंतर शिल्पाने तिचा बाण श्रुतिका अर्जुनवर साधला आहे. यावेळी शिल्पा शिरोडकर म्हणाली की, मी शृतिकाचे नाव घेऊ इच्छितो आणि ती बऱ्याचदा बोलत असते की मी ओरिजनल नाही आहे त्याचबरोबर ती दुसऱ्याच्या मतांना इग्नोर करते. श्रुतिका येते आणि ती दुसरे नाव शिल्पा शिरोडकरचे घेते आणि म्हणते की शिल्पा नेहमी टोमणे मारत असते म्हणून मी तिचे नाव घेत आहे. त्यानंतर करणवीर मेहरा येतो आणि तो विवियन डीसेनाची मैत्रीण एलिस कौशिकचे नाव घेतो. यावेळी करणवीर म्हणतो की, ती नेहमी टास्कमध्ये वूमन कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे मी तिला नॉमिनेट करत आहे. यावर विवियन डीसेना म्हणतो की, मी करणवीर मेहराच पत्र मी स्वीकारत नाही.
Promo #BiggBoss18 Postman task pic.twitter.com/7m7O5iOqUW
— The Khabri (@TheKhabriTweets) November 10, 2024
कालच्या भागामध्ये बिग बॉसने घरच्या सदस्यांसमोर राशनचे टास्क देण्यात आला होता. यावेळी बिग बॉसने सांगितले की, तुम्हाला राशनसाठी कोणत्याही पन्नास वस्तू घेण्याची परवानगी आहे. यावर घरातले सदस्य विरोध करतात. आणि म्हणतात बिग बॉस आम्हाला कमीत कमी ८० वस्तू घेण्याची परवानगी द्या. यावर बिग बॉस म्हणतात की मी तुम्हाला १०० वस्तू घेण्याची परवानगी देतो पण माझी यासाठी एक अट असणार आहे. यावर बिग बॉस घराच्या सदस्यांना सांगतात की मी तुम्हाला १५० वस्तू घेण्याची परवानगी देतो पण जर तुम्ही घरातला एकही नियम मोडला तर मी घरातले सगळे राशन पुन्हा घेईल ही अट तुम्हाला मंजूर आहे का? यावर घरातल्या सगळे सदस्य गोंधळात आणि ते चर्चा करायला सुरुवात करतात. यावर बऱ्याच जणांचे वाद होतात. त्यानंतर घरातले सदस्य ५० म्हणजेच बेसिक राशन घेण्याचा निर्णय घेतात.