(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ZEE5 या भारतातील सर्वात मोठ्या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक प्लॅटफॉर्म ओळखले जाते. लवकरच झी ५ पैठणी ही नवी मालिका सादर करण्यात येणार आहे. ज्याचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. या मालिकेची निर्मिती झी स्टुडिओज आणि आरंभ एंटरटेनमेंट यांची आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी गोदावरी या भूमिकेत दिसणार असून ईशा सिंग त्यांच्या मुलीच्या कावेरीच्या भूमिकेत झळकणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी या मालिकेचे प्रीमियर सुरु होणार असून त्यामध्ये परंपरा, चिकाटी आणि आई आणि मुलीचं सशक्त नातं याची झलक पाहायला मिळणार आहे. ‘आईच्या प्रेमाला मर्यादा नसते’ असं म्हणतात आणि या मालिकेत ते सौंदर्यपूर्ण पद्धतीनं दाखवण्यात आले आहे. आयुष्यात कितीही आव्हानं आली, तरी आई व मुलीमधील प्रेम आणि पाठिंबा त्यांचा मार्ग प्रकाशमान करत त्यांचा प्रवास आणखी खास करणारा असतो.
पैठणी या मालिकेत गोदावरीची प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळणार आहे.‘पैठणी’ ही मालिका प्रेम, त्याग, सक्षमपणा यावर भाष्य करणारी आहे. त्यात कशाप्रकारे कुटुंब आयुष्यातली आव्हानं पार करण्यासाठी शक्ती आणि चिकाटीची प्रेरणा देऊ शकतात हे दाखवण्यात येणार आहे. ही मालिका आपल्या उत्कंठावर्धक सादरीकरणानं प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
हे देखील वाचा- Bigg Boss : एकता कपूर रजत दलालवर संतापली, म्हणाली माझ्या वडिलांचे नाव घेतले असते तर…
आरंभ एंटरटेनमेंट निर्माते श्री. अभिषेक रेगे म्हणाले, ‘ZEE5 सह एकत्रितपणे ‘पैठणी’ या मालिकेची निर्मिती करून ती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्यासाठी हा आनंददायी क्षण आहे आणि कौटुंबिक नात्याची ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मृणाल कुलकर्णी आणि ईशा सिंग यांच्यासारखे कलाकार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचं दिग्दर्शन यांच्या मदतीने आम्ही या सीरीजच्या लाँचसह पुढच्या प्रवासासाठी उत्सुक आहोत.’ असे ते या मालिकेबद्दल म्हणाले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आपला दृष्टीकोन मांडत म्हणाले, ‘ही मालिका महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती मांडणाऱ्या सुंदर पैठणी साडीला सलाम करणारी आहे. आई आणि मुलीच्या नात्याच्या प्रवासातून आम्ही प्रेम, स्वप्नं आणि त्यांना येणारी आव्हानं मांडले आहे. ‘पैठणी’ या नावासह आम्ही या मालिकेत विणण्याच्या कौशल्यासह नात्यात जोडणारी मांडणी मांडली आहेत. आमच्या संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि आम्हाला आशा आहे, की ही मालिका सर्व ठिकाणच्या प्रेक्षकांना प्रेरणा देईल व ‘पैठणी’च्या कालातीत सौंदर्याप्रमाणे जवळची वाटेल.’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- Box Office Day 7: ‘भुल भुलैया 3’ ने सातव्या दिवशीही ‘सिंघम अगेन’ला दिली टक्कर, केला एवढ्या कोटींचा गल्ला पार!
ZEE5 हा मनोरंजनाच्या लाखो चाहत्यांसाठी तयार करण्यात आलेला भारतातील सर्वात तरुण आणि बहुभाषित ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. ZEE5 हा झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस लिमिटेड (झील) या कंटेंट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जागतिक कंपनीचे उत्पादन आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार व्हिडिओ स्ट्रीमिंग देणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर विस्तारित आणि वैविध्यपूर्ण कंटेट उपलब्ध असून त्यात 3500 फिल्म्स, 1750 टीव्ही शोज, 700 ओरिजनल्स आणि 5 लाखांपेक्षा जास्त तासांचा ऑन- डिमांड कंटेंट आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास ‘पैठणी’मध्येपाहायला मिळणार असून, ही मालिका 15 नोव्हेंबर रोजी प्रीमियर स्ट्रीमिंग ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.