(फोटो सौजन्य- X अकाउंट)
‘बँडिट क्वीन’ चित्रपटातून फिल्मी दुनियेत प्रवेश करणाऱ्या मनोज बाजपेयीने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या प्रत्येक अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. ‘सत्या’ चित्रपटापासून ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’ पर्यंत मनोजने आपल्या अभिनयाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत आपला समावेश केला आहे. स्वतःच्या कामाच्या आणि अभिनयाच्या कर्तृत्वावर या अभिनेत्याने आपले योग्य स्थान मिळवले आहे. नुकतीच त्याने इतर कलाकारांशी तुलना केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा विचार केला तर मनोज बाजपेयी व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी यांचे नाव निश्चितपणे यादीत येते. याशिवाय इतरही अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी या चित्रपटसृष्टीचा चांगलाच अनुभव घेऊन त्यांची गणना सर्वोत्तम कलाकारांमध्ये केली जाते. तसेच मनोज बाजपेयी यांची तुलना देखील या कलाकारांमध्ये केली जाते.
मनोज बाजपेयी यांची या कलाकारांसह तुलना
नुकताच सोशल मीडियावर एक कोलाज फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, राजपाल यादव, विक्रांत मॅसी, दिव्येंदू, स्पर्श श्रीवास्तव, जितेंद्र कुमार यांचे फोटो आहेत. हे शेअर करताना कॅप्शनमध्ये विचारले की, “त्यांच्यामध्ये सर्वात प्रतिभावान अभिनेता कोण आहे?” असे विचारल्यावर मनोज बाजपेयी यांनी या फोटोला चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. जे ऐकून चाहत्यांना आश्चर्य झाले आहे.
सर / मैडम मैं तो बहुत ही कमतर हूँ ! ये सब बहुत होनहार हैं ! मैं सिर्फ़ सबसे सीख रहा हूँ ! https://t.co/c2kcVOXYJl
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) July 25, 2024
मनोज बाजपेयीनी या तुलनेवर दिली प्रतिक्रया
मनोज बाजपेयीने या व्हायरल पोस्टवर आपली प्रतिक्रिया देऊन चाहत्यांची मने जिंकली आहेत. X वर ही पोस्ट रीशेअर करताना त्यांनी लिहिले, “सर-मॅडम, मी खूप कनिष्ठ आहे. हे सर्व कलाकार खूप आशादायक आहेत. मी फक्त या सगळ्यांकडून शिकत आहे.” असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले. आणि ते पाहून चाहत्यांना त्यांच्या बद्दल आणखी प्रेम आणि आदर वाढला आहे.
हे देखील वाचा- करण जोहर आणि गुनीत कपूरचा ‘ग्यारह ग्यारह’ कालचक्राचे बंधनं मोडायला सज्ज, ZEE5 वर ट्रेलर प्रदर्शित!
मनोज बाजपेयींच्या या उत्तराने चाहते खूश
मनोज बाजपेयींच्या या गोष्टीने चाहत्यांना त्यांचा आणखी आदर वाटत आहे. एका युजरने म्हटले की, “तुम्ही किती सुंदर फॅमिली मॅन आहात.” अशी प्रतिकिया देण्यास चाहत्यांची सुरुवात झाली. तसेच दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “सर तुम्ही सर्वोत्तम आहात. फॅमिली मॅन 3 ची आतुरतेने वाट पाहत आहोत.” तर तिसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले की, “ही तुमची नम्रता आहे.” तसेच एकजण म्हणाला, “पंकज सर आणि मनोज जी सर्वोत्कृष्ट आहेत. मला दोघेही खूप आवडतात.” अशा प्रतिक्रिया देऊन चाहत्यांनी त्यांचेच कौतुक केले आहे.