फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : चर्चेत असलेला रिऍलिटी शो बिग बॉस १८ मध्ये या आठवड्यामध्ये स्पर्धकांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या आठवड्यामध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना नवे नवे टास्क आणि सरप्राईझ देखील दिले होते. यामध्ये आता बिग बॉस १८ चा घराचा नवा टाइम गॉड हा रजत दलाल झाला आहे. टाइम गॉडच्या शर्यतीमध्ये चाहत पांडे, शिल्पा शिरोडकर आणि रजत दलाल हे होते. यामध्ये बास्केटचा टास्क जिंकून रजत दलाल नवा टाइम गॉड झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक नवी नाती पाहायला मिळाली आहेत. टाइम गॉडच्या टास्कमध्ये दिग्विजय राठी आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे. टास्क दरम्यान, दिग्विजय आणि अविनाश यांच्यात काही मुद्द्यावरून वाद सुरू होईल आणि हा वाद हाणामारीत वाढेल.
हेदेखील वाचा – Bigg Boss 18 : करणवीर मेहराला मैत्रीत धोका! पहिल्यांदाच झाला भावुक, अश्रू झाले अनावर
प्रोमोच्या सुरुवातीला दिग्विजय अविनाशला म्हणतो, ‘तुझ्या डोळ्यातली भीती पाहून मला मजा येते.’ यानंतर अविनाश आणि दिग्विजय यांच्यात वाद सुरू झाला. वाद घालताना दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. एवढेच नाही तर ते एकमेकांना धक्काबुक्कीही करू लागतात. अशा परिस्थितीत ईशा आणि ॲलिस यांना मध्ये येऊन दोघांना वेगळे करावे लागेल. कार्य सुरू होते आणि अशावेळी अविनाश त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे धावतो आणि मग दिग्विजय जमिनीवर कोसळतो. कुटुंबीयांना काय झाले ते समजत नाही. अशा स्थितीत तो घाबरून ओरडू लागतो. प्रोमो पाहिल्यानंतर लोकांचा असा विश्वास आहे की अविनाशने जाणूनबुजून दिग्विजयला जमिनीवर फेकले आहे.
तर दुसरीकडे आता या आठवड्यामध्ये सध्या सात सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे. यामध्ये रजत दलाल, करणवीर मेहरा, चुम दारंग, दिग्विजय राठी, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर आणि तिजेंदर बग्गा हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता बिग बॉसच्या वोटिंग ट्रेंडची रँकिंग समोर आली आहे. यामध्ये सध्या अव्वल स्थानावर वाईल्ड कार्ड सदस्य दिग्विजय राठी आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर करणवीर मेहरा आहे. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर रजत दलाल आहे. चौथ्या स्थानावर श्रुतिका अर्जुन आहे. त्यानंतर पाचव्या स्थानावर चुम दारंग आहे. सहाव्या आणि सातव्या स्थानावर अनुक्रमे कशिश कपूर आणि तिजेंदर बग्गा आहे. या आठवड्यामध्ये शेवटच्या तीन स्थान धोक्यात आहेत त्यामुळे कोण जाणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
Breaking #BiggBoss18 !!!
LATEST VOTING TRENDS
🥇#DigvijayRathee✅
🥈#KaranveerMehra✅
🥉#RajatDalal✅
⭐️#ShrutikaArjun✅
⭐️#ChumDarang❌
⭐️#KashishKapoor❌
⭐️#TajinderBagga❌Note : Digvijay is leading with @KaranVeerMehra with huge margin & Bagga ji & Kashish is last💯…
— The Khabri Tak (@TheKhabriTak) November 14, 2024
बरेचजण सोशल मीडियावरील वोटिंग ट्रेंडने अंदाज लावत आहेत की जर या आठवड्यामध्ये डबल एव्हिक्शन झाले तर कशिश कपूर आणि तिजेंदर बग्गा यांना घराबाहेरच रस्ता दाखवला जर आहे.