‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi) ही मालिका वेगळा विषय असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे भाग प्रेक्षकांना दुपारी साडेचार वाजता पाहता येतील. गेल्या काही दिवसांत अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. दुसरीकडे नव्या मालिकांच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
बॉस आणि मिहीर यांची गोष्ट नवीन वेळेत बघायला मिळणार!
पाहा, ‘बॉस माझी लाडाची ‘
१२ सप्टेंबरपासून, सोम.-शनि., दु. ४.३० वा..
सोनी मराठी वाहिनीवर. #बॉसमाझीलाडाची । #BossMaziLadachi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/lFT8nHjjE7— Sony मराठी (@sonymarathitv) September 10, 2022
‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत मागे पडली आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असं म्हटलं गेलं. पण आता या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका सध्या साडेआठ वाजता दिसत आहे. पण आता ही मालिका साडेआठ ऐवजी दुपारी साडेचार वाजता पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक १२ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षक दुपारी साडेचार वाजता सोनी मराठीवर पाहू शकतात.
‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेत अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( Aayush Sanjeev) मुख्य भूमिकेत आहेत.