Dunki first look : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh khan) पठाण सिनेमाने (Pathan Cinema) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. शाहरुख खानने पठाण या चित्रपटाद्वारे सिल्व्हर स्क्रीनवर दमदार पुनरागमन केले आहे. पठाणनंतर आता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून, ‘जवान’नंतर शाहरुख खान चित्रपट निर्माते राजकुमारी हिरानीच्या (Rajkumar Hirani ) ‘डंकी’ चित्रपटात (Dunki Movie) दिसणार आहे. किंग खानच्या डंकी या सिनेमाबाबत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील शाहरुख खानचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जिओ सिनेमाच्या एका इव्हेंटमध्ये 100 हून अधिक चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे, दरम्यान शाहरुखचा डंकीमधील लूकही व्हायरल झाला आहे.
ग्रीन टी शर्ट मध्ये दिसतोय शाहरुखचा लूक
डंकीच्या फर्स्ट लूकमध्ये, शाहरुख खान चित्रपट निर्माते राजकुमार हिरानीसोबत उभा दिसत आहे, जिथे शाहरुख खानने हिरवा टी-शर्ट घातलेला दिसत आहे तर त्याच्या खांद्यावर बॅग लटकलेली आहे. शाहरुख खानसोबत या सिनेमात तापसी पन्नू दिसणार आहे. आत्तापर्यंतच्या वृत्तानुसार, डँकी हा चित्रपट अशा स्थलांतरितांवर आधारित आहे ज्यांना यूएस किंवा कॅनडाला जायचे आहे, कारण अशा फ्लाइटला डंकी फ्लाइट म्हणतात. मात्र, चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कधी रिलीज होणार डंकी ?
सुमारे 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘डंकी’ हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे, मात्र या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. डँकीपूर्वी ‘जवान’ हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, ज्याची निर्मिती साऊथचे दिग्दर्शक ‘अटली’ करत आहेत. जवान या चित्रपटासोबतच सलमान खानच्या टायगर ३ या चित्रपटातही शाहरुख खानचा कॅमिओ दिसणार आहे. थोडक्यात काय तर 2023 हे वर्ष पुन्हा एकदा शाहरुख गाजवणार असं म्हणायला हरकत नाही.