शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Dunki Trailer Release) अखेर आज (5 डिसेंबरला) प्रदर्शित झाला. खूप दिवसांपासून चाहते याची वाट पाहत होते. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला ड्रॉप 4 असे नाव देण्यात आले आहे. पठाण, जवान नतंर आता शाहरुख खान अतिशय वेगळ्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे.
[read_also content=”बायजूवर ओढवलं आर्थिक संकट, कर्मचार्यांना पगार देण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते; संस्थापकावर घर गहाण ठेवण्याची ओढवली वेळ! https://www.navarashtra.com/india/the-founder-of-byjus-pledges-his-house-to-pay-the-salaries-of-the-employees-nrps-486374.html”]
‘डंकी’ टीझर आणि दोन गाण्यांनंतर प्रेक्षकांना त्याच्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची ही मागणी पूर्ण करत निर्मात्यांनी तीन मिनिटे आणि एक सेकंदाचा ड्रॉप 4 रिलीज केला. ट्रेलर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, “भारतीय सिनेमा शिखरावर आहे. हा सिनेमाचा खरा अर्थ आहे.” दुसर्याने लिहिले, “भावना + अॅक्शन + कॉमेडी + ड्रामा + मैत्री, थिएटरमधील अनुभव एक संपूर्ण रोलरकोस्टर राईड असेल, आता संपूर्ण भारतातील प्रेक्षक हे पाहतील की 500 कोटी हिंसाचार, कृतीशिवाय कसे बनवले जातात.” दुसर्या युझरने लिहिले, “या डिसेंबरमध्ये खरा सिनेमा काय असतो हे जनतेला कळेल…”
चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचं दिगदर्शन केलं आहे. गौरी खान, जियो स्टूडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 22 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.