हॅालिवूडमधुन (Hollywood) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस’ फेम प्रसिद्ध अभिनेता विन डिझेलवर (Vin Diesel) त्याची माजी सहाय्यकने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आस्टा जॉन्सनच्या तक्रारी वरुन विन डिझेलवर गुरुवारी लॉस एंजेलिसमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. या बातमीने हॅालिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”मनी लाँड्रिंग प्रकरणात ट्वि्स्ट, हायप्रोफाइल ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिली धमकी; म्हणाला, पर्दाफाश करणार! https://www.navarashtra.com/india/sukesh-chandrasekhar-threaten-to-expose-jacqueline-fernandez-n-monesy-laundring-case-nrps-491400.html”]
2010 मध्ये अटलांटा येथे फास्ट फाइव या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विन डिझेलनं लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आस्टा जॉन्सनने केला आहे. आस्टा जॉन्सनने सांगितले की, ती त्यावेळी त्याच्यासोबत ती काम करत होती. एकदा शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर विन डिझेलने तिला हॉटेलच्या रूममध्ये बोलावले आणि त्याने तिच्यावर अनेकदा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी विन डिझेलच्या वकिलाने निवेदन जारी केले आहे.या निवेदनात वकील ब्रायन फ्रीडमन म्हणाले की, ‘विनवरील सर्व आरोप आम्ही ठामपणे फेटाळतो. 13 वर्षांपूर्वी झालेल्या या दाव्याबद्दल त्याने पहिल्यांदाच ऐकले आहे, ज्याचा त्याच्यावर 9 दिवस काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. हे निराधार आरोप खोटे सिद्ध करणारे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत.