फिल्म इंडस्ट्रीतून अचानक एक्झिट घेतलेली 'दंगल गर्ल' सध्या काय करते ?
दंगल चित्रपटामध्ये आमिर खानची (Amir Khan) मोठी मुलगी गीता म्हणून काम करणाऱ्या फातिमा सना शेखचा आज वाढदिवस आहे. ती आज तिचा ३२ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. कमल हसन यांच्या ‘चाची 420’ या लोकप्रिय चित्रपटामध्ये फातिमाने बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर ती बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’ बनली. फातिमाचा जन्म जरीही हैद्राबादमध्ये झाला असला तरीही ती मात्र लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. जन्मत: हिंदू असलेली बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’चं नाव मुस्लिम कसं काय ? शिवाय तिने अचानक इंडस्ट्रीतून एक्झिट का घेतली जाणून घेऊया…
आई तुळजाभवानीच्या मदतीसाठी भूतलावर भवानीशंकर रूपात येणार साक्षात महादेव !
फातिमाचा जन्म जरीही हैद्राबादमध्ये झाला असला तरीही ती मात्र लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. फातिमा हिंदू कुटुंबात जन्माला आली आहे. तिच्या वडिलांचं नाव विपीन शर्मा असं असून तिची आई राज तब्बसुम काश्मीरी मुस्लिम कुटुंबातून आल्या आहेत. फातिमाची आई श्रीनगरची असून तिचे वडील विपीन शर्मा हे जम्मूतील ब्राम्हण कुटुंबातील आहेत. फातिमाचे वडील जरीही हिंदू असले तरी फातिमाच्या घरी मुस्लीम धर्माचंच पालन केलं जायचं. म्हणूनच तिचं नाव फातिमा सना शेख तर तिच्या भावाचं नाव शानिब शेख असं ठेवण्यात आलं होतं.
अल्ट्रा झकासवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणार नव्या कलाकृतींची मेजवानी, पाहा यादी
जर तुम्हाला वाटत असेल की ‘दंगल’ हा फातिमा सना शेखचा पहिला चित्रपट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. फातिमा पहिल्यांदा १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘चाची 420’ चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर तिने ‘वन टू का फोर’ या चित्रपटातही काम केले होते. मात्र, या चित्रपटानंतर ती तब्बल १५ वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली होती. फातिमाने छोट्या पडद्यावरही काम केले आहे. तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘लेडीज स्पेशल’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने तिने अभिनय सोडायचा निर्णय घेतला.
तिने अनेकदा मुलाखतींमध्ये तिला फोटोग्राफीमध्ये रस असल्याचे सांगितले आहे. फातिमाने फोटोग्राफीमध्ये काम करायला सुरुवात केली होती, त्यानंतरच तिला ‘दंगल’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी ती आली आणि 6 फेऱ्या पार केल्यानंतर तिला गीता फोगटची भूमिका मिळाली. फातिमा सना शेखचाही लग्नावर विश्वास नाही. जर तुम्हाला एखाद्यासोबत राहायचे असेल तर कोणत्याही कागदपत्रात लिहून ते नाते सिद्ध करण्याची गरज नाही, असे या अभिनेत्रीचे मत आहे.






