सलमानच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार
१४ एप्रिल रोजी रविवारी पहाटे 5 वाजताअभिनेता सलमान खानच्याॉ मुंबईतील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोघांनी गोळीबार केला. या प्रकरणी सुरुवातील दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आरोपींना पंजाब मधून अटक करण्यात आली. त्यापैकी अनुज थापन या आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या केली. आता त्याच्या कोठडीतील मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत थापनच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.