फोटो सौजन्य - सोशल मीडिया
द ग्रेट इंडियन कपिल शो : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवरचा प्रसिद्ध नवीन शो “द ग्रेट इंडियन कपिल शो”चा नवा सिझन सुरु झाला आहे. हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. मागील भागामध्ये सुधारमूर्ती आणि त्याचे पती त्याचबरोबर झोमॅटोचे मालक आणि त्याची पत्नी शोमध्ये आले होते. आता या शोचा नवा भागाचा प्रोमो समोर आला आहे आणि पुढील भाग मनोरंजक होणार आहे. कपिलच्या शोमध्ये सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये माजी क्रिकेट खेळाडू नवज्योत सिंग सिद्धू या शोमध्ये कायमस्वरूपी पाहुणे म्हणून दिसला होता. त्यानंतर त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे त्याला शो सोडावा लागला होता. आज पुन्हा तो कपिल च्या नव्या शोमध्ये म्हणजेच द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये पुनरागमन करणार आहे. यावेळी तो त्याच्या पत्नीसोबत दिसणार आहे.
हेदेखील वाचा – ‘पुष्पा २’ साठी अल्लू अर्जुनने घेतल तगडं मानधन; फहाद फाजिल, रश्मिका मंदान्नाने घेतली तुटपुंजी फी
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हा अर्चना पूरण सिंह यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत होते. नवज्योत सिंग सिद्धूचा प्रवेश होताच प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्याचं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर शोमध्ये असे दाखवण्यात आले की कपिल म्हणतो – मी काय म्हणत होतो… आणि मग नवज्योत सिंग सिद्धूला पाहून त्याला धक्का बसतो. मग नवज्योतसिंग सिद्धू कपिलला म्हणतो- नीट बघ, मी नवज्योत सिंग सिद्धूच आहे. यानंतर अर्चना पूरण सिंह धावत येते आणि कपिलला म्हणते की, सरदार साहेबांना माझ्या खुर्चीवरून उठायला सांग व्यापून बसले आहेत. गमतीदार गोष्टी झाल्यानंतर बऱ्याच आणखी काही मजेदार घटना पाहायला मिळणार आहे.
नवज्योत सिंग सिद्धूसोबत भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग शोमध्ये दिसणार आहे. हरभजन सिंग येताच म्हणतो की, जग काहीही म्हणो, कोणाच्या बोलण्याने कोणी मूर्ख बनत नाही, कोणी खुर्चीवर बसू शकत नाही आणि कोणी खुर्चीवर बसून सिद्धू बनत नाही. यानंतर नवज्योत सिंग सिद्धूने हरभजनला मिठी मारली. शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूची पत्नीही येते. ती सांगते की, आमच्या लग्नाला ३२ वर्षे झाली आहेत. शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धूने खूप धमाल केली आहे. सगळ्यांना खूप हसवले. शोमध्ये खुर्चीवरून रस्सीखेच सुरू आहे. शोमध्ये सुनील ग्रोव्हर नवज्योत सिंग सिद्धूच्या भूमिकेत दिसत आहे.
याआधी अनेक मोठे बॉलीवूडचे कलाकार शोमध्ये येऊन गेले आहेत. त्याचबरोबर भारताचा विश्वविजेत्या संघाच्या काही खेळाडूंना शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, शिवम दुबें, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह हे खेळाडू आले होते. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि कारण जोहरने सुद्धा शोमध्ये येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. भूल भुलैया ३ च्या प्रमोशनसाठी विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी देखील शोमध्ये आले होते.