(फोटो सौजन्य-Social Media)
आलिया भट्ट बी-टाऊनची प्रतिभावान अभिनेत्री आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तिचे स्थान निर्माण केले आहे. जागतिक ब्रँडचा चेहरा बनण्यापासून ते हॉलिवूडमध्ये अभिनय करण्यापर्यंत आलिया भट्ट सर्वत्र झळकत आहे. आता ती पहिल्यांदाच जागतिक फॅशन शोचा भाग बनणार आहे.
फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट करणार पदार्पण
गंगूबाई काठियावाडीसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी आलिया भट्ट लवकरच पॅरिस फॅशन वीक 2024 मध्ये पदार्पण करणार आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे ग्लॅमर नेहमीच पाहायला मिळते, मात्र यावेळी ऐश्वर्या रायसोबत आलिया भट्टही रॅम्पवर चमकणार आहे.
या दिवशी आलियाचा फॅशन शो आयोजित केला जाणार आहे
आलिया भट्ट फ्रेंच पर्सनल केअर ब्रँड L’Oreal Paris ची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर आहे. Le Defile L’Oreal Paris साठी रॅम्पवर झळकणार आहे. आलिया भट्ट 23 सप्टेंबर 2024 रोजी प्लेस डे ल’ओपेरा येथे आयोजित पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसणार आहे.
आलिया भट्टचे आगामी चित्रपट
फॅशन शो व्यतिरिक्त आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिचा जिगरा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच जिगराचा टीझर ट्रेलर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटात ती वेदांग रैनाच्या ऑन-स्क्रीन बहिणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती आलियाने करण जोहरसोबत केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा- निर्माते शेखर कपूर ‘मासूम… द नेक्स्ट जनरेशन’ चित्रपटाबाबत झाले भावुक सांगितली कथा!
जिगरा व्यतिरिक्त आलिया भट्टचा आणखी एक बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ती पुन्हा एका चित्रपटात काम करत आहे. भन्साळींच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात ती विकी कौशल आणि पती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही. परंतु चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.