(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
लक्षवेधक कथानक आणि अर्थपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाणारे चॅनेल सोनी बीबीसी अर्थने आपली फोटोग्राफी स्पर्धा ‘अर्थ इन फोकस’चे चौथे पर्व लाँच केले आहे. अनेक शक्यतांच्या कॅन्व्हाससह चॅनेलने फोटोग्राफी प्रेमींना थीम ‘वन वर्ल्ड, मेनी फ्रेम्स’अंतर्गत भारताबाबत त्यांचा अद्वितीय दृष्टिकोन सादर करण्यासाठी मंच स्थापित केला आहे.
‘अर्थ इन फोकस’ आपल्या भूमातेच्या समृद्धतेला साजरे करते आणि व्यक्तींना त्यांच्या दृष्टिकोनांच्या माध्यमातून व्यापक विविधितेमध्ये त्यांची एकता दाखवण्याची संधी मिळवून देते. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी व्यक्ती ‘मार्केट्स: ए व्हायब्रण्ट मेल्टिंग पॉट’, ‘अॅन्सियण्ट मार्वल्स’ आणि ‘वाइल्डलाइफ’ या उपश्रेणी अंतर्गत मायक्रोसाइटवर (microsite) त्यांचे फोटोग्राफ्स सबमिट करू शकतात. महिनाभर चालणाऱ्या या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात फोटोग्राफर शिवांग मेहता यांच्याद्वारे केले जाणार आहे. सोनी अल्फा अॅम्बेसेडर आणि इंटरनॅशनल लीग ऑफ कन्झर्वेशन फोटोग्राफर्स (आयएलसीपी)चे फेलो असलेले शिवांग यांचे वन्यजीवन आणि कन्झर्वेशन फोटोग्राफीप्रती कौशल्य आणि आवड त्यांचे पुरस्कार-प्राप्त पुस्तके आणि ‘प्रोजेक्ट चीता’ सारख्या असाइनमेंट्स दिसून आले आहेत.
श्रेणींमधील अव्वल तीन विजेत्यांना गोप्रो हिरो १२ चे भव्य बक्षीस दिले जाणार आहे. तसेच सोनी बीबीसी अर्थ चॅनेलवर झळकण्याची जीवनातील अमूल्य संधी देखील या स्पर्धकांना दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, अव्वल १५ सिलेक्शन्सना मास्टरक्लासच्या माध्यमातून श्री. शिवांग मेहता यांच्याकडून विशेष मार्गदर्शनाची संधी देखील स्पर्धकांना प्राप्त होणार आहे.
हे देखील वाचा- सिंघम अगेनचा क्लायमॅक्स 500 राक्षसांसह दिसणार, रोहित शेट्टीने शेवटच्या सीनमध्ये केला मोठा बदल!
‘अर्थ इन फोकस’ – ‘वन वर्ल्ड, मेनी फ्रेम्स’ फोटोग्राफी स्पर्धा, तसेच स्पर्धेचे नियम, सबमिशन मार्गदर्शकतत्त्वे आणि अपडेट्सबाबत जाणून घेण्यासाठी अधिक माहितीसाठी कृपया तुम्ही ही वेब साईट तपासून पाहू शकता. https://www.sonybbcearth.com/Earthinfocus/