प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालने स्वत:च रचला आपल्या किडनॅपिंगचा प्लान? क्लिप व्हायरल
कॉमेडियन सुनील पाल २ डिसेंबर रोजी बेपत्ता झाला होता. मंगळवार, ३ डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने सुनील हरवल्याची तक्रार देण्यासाठी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेली होती. सुनील पालसोबत त्यांचा २४ तास कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता, त्यानंतर सुनीलची पत्नी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. काही काळानंतर पोलिसांनी अभिनेत्याचा शोध सुरू केला असता तो ३ डिसेंबरला घरी येईल, अशी माहिती मिळाली. घरी परतल्यानंतर सुनीलने संपूर्ण घटना आपल्या घरच्यांना सांगितली.
‘कॉमेडी क्वीन’ शिवाली परबचा स्टायलिश अंदाज, लंडनमधील फोटोंनी नेटकऱ्यांचे वेधले लक्ष…
सुनीलने त्याच्यासोबत घडलेली सर्व हकिकत एका मुलाखतीतून त्याने सांगितली. त्याचे अपहरण करण्यात आल्याची माहिती त्यानी दिली. तो एका कार्यक्रमासाठी दिल्लीत आला होता. दिल्लीच्या बॉर्डरवरून काही किडनॅपर्सने सुनीलला किडनॅप केले होते. इंडिया टुडे डेलीसोबत बोलताना सुनीलने पुढे सांगितले की, “मला एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. कार्यक्रमाला जायचं आहे असं सांगून मला एका व्यक्तीने तिथून अपहरण करुन नेलं. किडनॅपर्सने २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पण मी कसेबसे साडेसात लाख रुपये जमा केले आणि नंतर त्यांनी मला तिथून सोडून दिलं.”
मुलाखती दरम्यान सुनीलने त्याचं किडनॅपिंग म्हणजे, पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणणाऱ्यांवरही त्याने निशाणा साधला आहे. त्याच्यासोबत संपूर्ण घटना सांगताना सुनीलने सांगितले की, “मला अमित नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. मी हरिद्वारमध्ये येऊन कार्यक्रम करावा अशी त्याची इच्छा होती. आयोजकांनी मला ॲडव्हान्स म्हणून माझ्या बँक खात्यात काही पैसे पाठवले होते. मी २ डिसेंबरला दिल्लीत एका ठिकाणी नाश्त्यासाठी उतरलो होतो. त्यावेळी माझ्या जवळ स्वतःला माझा चाहता म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने माझ्यासोबत फोटो क्लिक करून घेण्याच्या नावाखाली मला कारमध्ये धक्का देऊन बसवलं आणि तिथून अपहरण करून नेलं.
“माझं लग्न झालेलं…”, भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीने केले अनेक खुलासे
“त्यांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. ते मला एका दुमजली घरात घेऊन गेले होते आणि तिथे इतरही लोकं उपस्थित होते. तिथले काही लोकं मला धमकावू लागले. त्यांनी माझ्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. माझ्याजवळ एटीएम कार्ड नाही, असं म्हटल्यावर ते वेगवेगळे पर्याय शोधू लागले. त्यांनी माझा फोनही घेतला होता. त्यांनी माझ्या मित्रांना फोन करण्यासाठी मला फोन दिला होता. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सोडलं. घरी जाण्यासाठी विमानाचे तिकिट काढण्यासाठी २० हजार रुपयेही दिले. अपरहरणकर्त्यांनी मला कोणतीही दुखापत केली नाही. या घटनेमुळे माझ्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम झाला.”
“सुरुवातीला मी याबद्दल सार्वजनिकपणे बोलायचं नाही, असं ठरवलं होतं. पण माझ्या पत्नीने पोलिसांशी संपर्क साधला, त्यामुळे मला पुढे यावे लागले. त्यांनी मला एका रस्त्याच्या कडेला सोडलं. मग मी ऑटो आणि मेट्रोने दिल्ली विमानतळावर गेलो. मी पोलिसांना माझ्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. ते आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपहरणकर्त्यांनी माझ्या फोनवरून सर्व कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे हटवले आहेत. त्यांनी माझी वैयक्तिक माहिती घेतली आहे. त्यांनी माझ्या मुलाच्या शाळेचे तपशील आणि आईचा पत्ता घेतला आहे. या घटनेनंतर मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटतेय.” असं सुनील पाल म्हणाला.
“किडनॅपिंगच्या घटनेने मला धक्काच बसला आहे. देशातल्या नागरिकांना कडक सुरक्षा मिळावी. मला मानसिक आघात झाला आहे. तसेच पोलीस तक्रारही दिली आहे. जे केलं ते फक्त प्रसिद्धीसाठी असतं तर, आम्ही या प्रकरणात पोलिसांना केव्हाच सामील केलं नसतं. मी जिवंत असल्याबद्दल कृतज्ञ आहे, आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे.” असं सुनिल मुलाखतीच्या शेवटच्या भागात म्हणाला आहे. किडनॅपर्सने पैसे काढण्यासाठी वेगवेगळे बॅंक अकाउंट्स वापरल्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत असल्याचंही सुनीलने सांगितलं.