"माझं लग्न झालेलं...", भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीने केले अनेक खुलासे
शाहरुख खान आणि सलमान खानच्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर भारतात बुधवारी परतली. तिने भारतात परतल्यानंतर आपल्या भावना शेअर केल्या आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक भावूक व्हिडिओ शेअर केला. त्यात तिने भारतात येण्याचं कारण सांगत भारताचा झालेला कायापालट पाहून तिचे डोळे पाणावले. परदेशातून भारतात आल्यानंतर ममताने ‘न्यूज १८’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने भारतात येण्याचं कारण सांगितलं असून विकीबद्दलही तिने भाष्य केले आहे.
२००० कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणावर ममता कुलकर्णीचं महत्वाचं विधान, काय म्हणाली अभिनेत्री ?
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने सांगितले की, “मी गेल्या २५ वर्षांपासून परदेशात होते. मी तिथे राहून स्वत:चा शोध घेत होते. मी भारतात येण्याचं कारण म्हणजे, येत्या २०२५ मध्ये होत असलेला कुंभमेळा. त्यासाठीच मी खरंतर भारतात आली आहे. मी बिग बॉससाठी आल्याच्याही चर्चा वाचल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत. २००० साली इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मी होते. त्यावेळी मी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. मी फिल्म इंडस्ट्री सोडली असून मला आता पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नाही.”
यानंतर अभिनेत्रीने विक्की गोस्वामीसोबतच्या नात्यावरही भाष्य केले आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्री म्हणाली, “मी विक्कीसोबत लग्न केलेलं नाही. तो माझा नवरा नाही, मी अविवाहित आहे. मी अद्यापही कोणाशीच लग्न केलेलं नाही. मी आणि विकी रिलेशनशिपमध्ये होतो, पण मी त्याला ४ वर्षांपूर्वीच ब्लॉक करून टाकलेय. विकी एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे, शिवाय तो मनानेही खूप चांगला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोकं त्याला भेटायला यायचे, त्यांच्याप्रमाणे मीही त्याला भेटली. पण त्याला भेटणारी मी इंडस्ट्रीतील शेवटची व्यक्ती आहे.”
देवीच्या आशीर्वादाने नागा-शोभिताने केली नव्या आयुष्याची सुरुवात; लग्नानंतर दोघे दिसले एकत्र!
“मला जेव्हा विक्कीच्या बिझनेसबद्दल कळलं तेव्हाच मी त्याला सोडून दिलंय. तो दुबईच्या जेलमध्ये होता तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी मी ध्यानधारणा केली होती. २०१२ मध्ये विक्की तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर २०१६ मध्ये मी त्याला भेटले. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली. पण त्याला पुन्हा अटक करण्यात आली. तो आता माझ्या भूतकाळातला एक भाग म्हणून राहिला आहे, मी त्याला केव्हाच सोडून दिले आहे.” विक्की गोस्वामीला १९९७ मध्ये अवैध ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या काळातही ममता अनेकदा त्याला तुरुंगात भेटण्यासाठी जायची. ममताने आणि विक्कीने तुरुंगातच लग्न केले असल्याची माहितीही काही मीडिया रिपोर्ट्सने दिलेली आहे. पण ममताने दिलेल्या माहितीनुसार ती सिंगलच आहे.