पुष्पा 2 सुरू असतानाच प्रेक्षकांना त्रास
Pushpa 2 Mumbai Incident: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या चित्रपट गृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान पुष्पा 2 येताच अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. प्रसिद्ध झाला. यावेळी मोठी चेंगराचेंगरी झाली असून या दरम्यान एका महिलेचा दूर्देवाने मृत्यू झाला. तर तिचा मुलगा हा गंभीर जखमी झाला. ही घटना ताजी असताना मुंबईतील वांद्रे सिनेमागृहात धक्कादायक प्रकार समोर आला. पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानत प्रेक्षकांची तब्येत बिघडू लागली. सध्या याचा व्हिडीओ समोर आला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वांद्रे येथील गॅलेक्सी थिए़टरमध्ये पुष्पा 2 द रुल,हा चित्रपट सुरु असताना एका अज्ञात व्यक्तीने अचानक विषारी गॅस फवारला. हा गॅस फवारल्यानंतर थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना अचानक त्रास होऊ लागला. या गॅसमुळे प्रेक्षकांना खोकला, घशात जळजळ आणि उलट्या झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरानंतर चित्रपटाचे प्रेक्षपण 15 ते 20 मिनिटे थांबवण्यात आले होते. मुंबई पोलिसांना या सर्व प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी, वांद्रे येथील गॅलेक्सी थिएटरची तपासणी केली.
IANS च्या रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने सिनेमा हॉलमध्ये अचानक मिरचीचा स्प्रे फवारला ज्यामुळे तिथे उपस्थित लोकांना खोकला आणि काही लोकांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर शो तात्काळ बंद करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये थिएटरमधील लोक त्रस्त झालेले दिसतात. खोकला आणि इकडे तिकडे फिरताना दिसतो.
Mumbai: (More visuals) During the film Pushpa 2: The Rule show at Gaiety Galaxy Theatre in Bandra, a substance was sprayed, causing people to cough and experience difficulty breathing https://t.co/00R2H9Ss3U pic.twitter.com/xl5IPcTK96
— IANS (@ians_india) December 6, 2024
पुष्पा 2 संपूर्ण भारतात प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्ड मोडत कमाई केली आहे. या सर्व सकारात्मक बातम्यांदरम्यान हा चित्रपट काही चुकीच्या कारणांमुळेही चर्चेत आहे. पहिला दिवस: हैदराबादमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि दोन लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांना पाहताच चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि चेंगराचेंगरी होऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यांचा 9 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला.तो रुग्णालयात असून त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेकावत यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.