मुंबई: ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s got talent ) या टॅलेंट रियालिटी शोमध्ये काही अद्भुत प्रतिभांचे दर्शन प्रेक्षकांना घडत आहे, ज्यात मनोरंजन आणि कौशल्य दोन्हीची सांगड घालण्यात येते. या वीकएंडला प्रथम सेलिब्रिटी पाहुणे म्हणून बॉलीवूडचा ही-मॅन धर्मेंद्रला (Dharmendra) ‘धर्मेंद्र स्पेशल’ शोसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या महान अभिनेत्याच्या काही गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म करून शोमधील सर्वोत्तम 14 स्पर्धक प्रेक्षकांना नक्कीच भूतकाळाची सैर घडवून आणतील.
मुंबईहून आलेल्या नितीश भारती(Nitish Bharati) या स्पर्धकाने पहिल्यापासून आपल्या सॅंड आर्ट अॅक्ट्सने परीक्षकांना प्रभावित केले आहे. या वीकएंडला एक पाऊल पुढे जात त्याने धरमजींसाठी काही तरी खास केले. त्याने धर्मेंद्रचे गाव सानेहवालपासून ते मुंबईत बॉलीवूडमध्ये ही-मॅन म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यापर्यंतचा प्रवास आपल्या कलेतून मांडला. आपल्या कलेमधून तो धर्मेंद्रच्या आयुष्यातील काही ठळक घटना सादर करून सर्वांना हेलावून टाकताना दिसेल. हा अॅक्ट पाहून परीक्षक किरण खेरचे डोळे पाणावलेले दिसले!
या अॅक्टबाबत विशेष गोष्ट ही होती की, नितीश धर्मेंद्रच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी स्वतः सानेहवालला गेला होता आणि धर्मेंद्रचे लहानपण जेथे व्यतीत झाले तेथे त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांकडून जास्तत जास्त माहिती त्याने गोळा केली. या अॅक्टला स्वतःचा खास स्पर्श देण्यासाठी, त्याने सानेहवालमधून वाळू देखील आणली होती आणि तिचा उपयोग आपल्या अॅक्टमध्ये केला. या अप्रतिम अॅक्टचे आणि या अनोख्या प्रतिभेचे कौतुक धर्मेंद्रने उभे राहून टाळ्या वाजवून केले आणि नितीशला ‘गोल्डन बझर’ देखील दिला.
नितीशच्या परफॉर्मन्सबद्दल धर्मेंद्र म्हणाला, “आपने बहुत अच्छा किया. जो भी दिखाया, मेरी रूह रूह को झिंझोड दिया.” खास धर्मेंद्रसाठी बनवलेल्या सॅंड पोर्ट्रेटबरोबरच नितीश सानेहवालहून आणलेली वाळू देखील धर्मेद्र यांना भेट म्हणून दिली.