मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच ‘कपिल शर्मा शो’ (kapil sharma show)मध्ये येणार आहे. या शोमध्ये कपिलने माधुराला तिच्या खाजगी आयुष्यातील किस्से विचारले आहेत. खास करून पती श्रीराम नेेने यांच्या पहिल्या भेटीत नेमकं काय झालं होतं? असा प्रश्न विचारताच माधुरीच्या गालावरची कळी खुलली आणि ती हसून लाजली.
कपिल शर्मा विचारतो,”हृदयाचे ठोके सांभाळणे सामान्य माणसाला जमत नाही. म्हणूनच तुम्ही हृदयाच्या डॉक्टरसोबत लग्न केले आहे. डॉक्टर नेनेंनी जेव्हा तुमचा हात हातात घेतला तेव्हा ते माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणाले की त्यांच्या हृदयाची धडधड जास्त वाढायला लागली त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना बोलवण्याची गरज लागली”. कपिल शर्माचे हे बोलणे ऐकून माधुरी दीक्षित हसायला लागते.
माधुरी दीक्षितची (Madhuri Dixit)’द फेम गेम’ ही वेबसीरिज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून माधुरी ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी माधुरी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसून येणार आहे.
या कार्यक्रमात माधुरी तिच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसणार आहे.