फोटो सौजन्य: सोशल मीडिया
2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय झाला आहे. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आणि यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा 242 धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय गाठले. टीम इंडियाच्या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने शानदार शतक झळकावत उर्वरित संघांना इशारा दिला.
पायाला प्लास्टर, हातात कुबड्या; या प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉस्पिटल मध्ये वाईट अवस्था, Viral Video
गायक सलील कुलकर्णी यांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारे सलील कुलकर्णी कायमच सामाजिक विषयावर आपले मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच त्यांनी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पाकिस्तानकडून फिरकी गोलंदाजावर अबरार अहमद हा उत्कृष्ट कामगिरी करणारा एकमेव खेळाडू होता. त्याने २८ धावांत १ विकेट घेतली. जबरदस्त फॉर्मात आलेल्या शुभमन गिलची महत्त्वाची विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला.
“हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं, तोची…”; किरण माने यांची ‘छावा’वरील पोस्ट चर्चेत
भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर गिल सलग दुसऱ्यांदा अर्धशतकाकडे वाटचाल करत होता. पाकिस्तानविरुद्ध तुफान फटकेबाजी केल्यानंतर ४६ धावांवर असताना गिल अबरारच्या चेंडूवर बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर, अहमदने डोळ्यांनी ड्रेसिंग रूमकडे जाण्याचा इशारा केला होता. नेटकऱ्यांना अबरारचे हे वागणे खटकले. भारताने सामना जिंकल्यानंतर सोशल मीडियावर अबरार अहमदला नेटकरी चांगलेच ट्रोल करीत आहेत. सध्या त्याच्यावर ट्रोलिंग होत असताना गायक सलील कुलकर्णींनीही त्याच्यावर खरमरीत टीका केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत आपल्या खास शैलीत झापलं आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये गायक सलील कुलकर्णी म्हणतात,
“तर बालमित्रांनो ,
हा माणूस पाहा ..उगीचच माज करताना दिसतो आहे ..
तुम्ही दबंग २ पाहिला असेलच .. त्यात गुंड विधायक बच्चा ह्याचा भाऊ .. गेंदा .. लग्नात जाऊन मुलीला पळवायला जातो .. आणि मग चुलबुल पांडे येतो .. तेव्हा हा छोटा गुंडूकला .. खूप बडबड करतो .. तेव्हा त्याचा assistant गुंड “लगता है गेंदा भैय्या भावनोमे बह गये है” असं म्हणतो आणि मग .. चुलबुल पांडे त्या गेंदा ची मान मोडतो .. ह्यांचं असंच झालं …
तात्पर्य – आपली कारकिर्द केवढुशी .. त्यात एक दिवसीय सामन्यात , तुमच्या देशातल्या कोणत्याही बॅट्समन पेक्षा सरासरी जास्त ( odi average 62.1) असलेल्या गिल ला .. ज्याच्याविषयी अफवा सुद्धा मोठ्या माणसांच्या मुलींबाबत उठतात .. अशा माणसाला कधीही उगाच बोलू नये .. !!
जुने जाणते सांगतात त्याप्रमाणे .. आपली उंची , पगार .. ताकद बघून शहाणपणा करावा .. !!
त्याने टाकलेला चेंडू चांगला होता पण बॉल ऑफ द टूर्नामेंट वगैरे म्हणजे पुन्हा एकदा कंमेंटरी मध्ये गेंदा भैय्या भावनेत वाहून जाण्याचा प्रकार .. असे बॉल .. रवी अश्विन प्रत्येक मॅच मध्ये टाकायचा आणि वरुण चक्रवर्ती वारंवार टाकतो ..
तेव्हा उगाचच जास्त शहाणपणा नसावा ..तर बालमित्रांनो , छोटी कामगिरी केलीत आणि नीट वागलात तर कौतुक होईल , शहाणपणा केला तर चुलबुल पांडे मान मोडेल ..
ता.क.१ – रशीद खान , नूर अहमद , नबी वगैरे अफगाण स्पिंनर्स याहून खूप भारी आहेत पण ते असला माज करत नाहीत.
ता.क.२ – बच्चा भैय्या, गेंदा, चुलबुल वगैरे नावं स्क्रिप्ट मध्ये सुचणाऱ्यांना वरचा “सा” द्यायलाच हवा…”