Isha Ambani Video: ईशा अंबानी (Isha Ambani ) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ईशा अंबानीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पती आनंद पिरामलसोबत (Anand Piramal) डिनर डेटवर जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स तिचे कौतुक करताना थकत नाहीत. अंबानी कुटुंबाची मुलगी ईशाचा साधा लूक लोकांना आवडत आहे.
ईशाच्या साध्या स्टाईलने चाहत्यांची मने लुटली
मानव मंगलानीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ईशा अंबानी अगदी सिंपल लूकमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा पती आनंद पिरामलही दिसत आहे. कपल अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून लोक ईशाच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
ईशा साध्या नाईट सूटमध्ये दिसली
या व्हिडिओमध्ये ईशा अंबानी साध्या नाईट सूटमध्ये दिसत आहे. ईशा अंबानीचे बॉडीगार्डही तिच्यासोबत आहे. आधी बॉडीगार्ड इशाच्या चाहत्यांना बाजूला करताना दिसत आहेत. त्यानंतर ईशा रेस्टॉरंटमध्ये शिरते. आनंद पिरामलही त्यांच्या मागे रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसत आहेत.
यूजर्सनी केली कमेंट
सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि ईशा डाउन टू अर्थ असल्याचं या यूजर्सचं म्हणणं आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हे कुटुंब सोशल मीडियावर सगळीकडे आहे.’ तर दुसर्याने लिहिले, ‘त्यांना अनोळखी लोकांशीही चांगले कसे बोलावे हे माहित आहे’. ईशा अंबानीचे कौतुक करताना एका चाहत्याने लिहिले, ‘ती किती क्यूट दिसत आहे.’ याशिवाय इतर यूजर्सही ईशाच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.