जिओ स्टुडिओजने (Jio Studios) एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘४ ब्लाइंड मेन’ (4 Blind Men) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित बोधकथेवर चित्रित केला आहे. या चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरील अंध व्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडलेल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते . एकामागोमाग एक अशा घडलेल्या खुनांमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य कायमच बदलून जाते.
नरकाचे दरवाजे: काम, क्रोध, लोभ आणि ???
एक नवा खेळ… चार खेळाडू…
क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे, शुभंकर तावडे आणि अंकुश चौधरी…
सगळे सुटणार…?
का सगळेच अडकणार…? #4BlindMen #unfoldingsoon #JioStudios #NikhilSane #NitinVaidya #abhishekmerukar @imAnkkush pic.twitter.com/z6RufSsrrk — Jio Studios (@jiostudios) August 22, 2022
नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) मुख्य भूमिकेत झळकत असून सोबतच शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या दिग्गज कलाकारांची फौज झळकत आहे.
[read_also content=”भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण https://www.navarashtra.com/sports/indian-team-head-coach-rahul-dravid-infected-with-corona-318734/”]
दिग्दर्शक अभिषेक मेरूकर चित्रपटाबद्दल सांगतात,“ जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील, असे कलाकार मला भेटले. मराठी चित्रपसृष्टीत पहिल्यांदाच थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार अनुभवला जात आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला चांगलाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेची मला उत्सुकता लागलेली आहे .”