बॅालिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता,निर्माता म्हणून करण जोहरनं (Karan Johar) चांगलचं नाव कमावलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त टिव्हीवरील कार्यक्रमामध्येही करण नेहमी दिसतो. त्याच्या हटके शैलीमुळे तो लोकप्रियही आहे. मात्र त्याल सोशल मीडियावर ट्रोलींगचा नेहमी सामना करावा लागतो. त्याने अनेकदा या बद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. करणनं पुन्हा एकदा त्याला ट्रोल करणाऱ्याबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्याय आहेत. नेमका काय म्हणाला करण ते जाणून घेऊया.
[read_also content=”‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं इथंच भोगावी लागेल…’ श्रेयस तळपदे-विजय राजच्या ‘कर्तम भुगतम’चा ट्रेलर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/shreyas-talpade-vijay-raaz-madhoo-aksha-starrer-psychological-thriller-film-kartam-bhugtam-trailer-released-nrps-530228.html”]
करणनं नुकतीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तो म्हणतोय की, मी माझ्या आईसोबत बसून टिव्ही पाहत होतो. तेव्हा मी एका कॉमेडी रिऍलिटी शोचा प्रोमो पाहिला. तो कॉमेडीएन माझी अत्यंत वाईट अशी मिमिक्री करत होता. मी हे ट्रोलर्सकडून आणि ज्यांचं काहीही नावं, चेहरा नाही, अशा लोकांकडून असं वागणं अपेक्षित करु शकतो. पण जेव्हा आपल्याच इंडस्ट्रीतली लोकं जो व्यक्ती 25 वर्षांपासून या क्षेत्रात आहे, त्याची खिल्ली उडवतात, तेव्हा वाईट वाटतं. याबद्दल मला अजिबात राग आलेला नाहीये, मला वाईट वाटलंय. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या असून करणला सपोर्ट केला आहे.
रिपोर्टनुसार, करणने ज्या कार्यक्रमातील त्याच्या मिमिक्रीचा उल्लेख केला आहे. तो सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे हा कार्यक्रम आहे. या कार्यकर्मात अभिनेता केतन सिंहने करण जोहरची मिमिक्री केली आहे. त्याने करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाला कॉफी विथ चुरण असं नाव दिलं आहे. या पूर्ण स्किटमध्ये तो करणच्या बोलण्याची आणि डान्सची मिमिक्री करत असल्याचं पाहायला मिळतंय. या शोचा प्रोमो पाहिल्यानंतर करणने त्याचा संताप व्यक्त केला आहे.