Karan Tejaswi Lip Lock : टिनसेल टाऊनमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक, करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) त्यांच्या अफेअरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. एकत्र बाहेर फिरणे असो, डिनर-लंच डेटवर जाणे असो किंवा पार्टी सेलिब्रेट करणे असो, करण-तेजस्वीचा प्रत्येक क्षण त्याच्या चाहत्यांना आवडतो. नुकताच या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे कपल लिप-लॉक करताना दिसत आहे.
करण-तेजस्वीचा लिप-लॉक व्हिडिओ
तेजस्वी आणि करण त्यांची मैत्रिण जसिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले होते. याठिकाणी दोघांनी खूप मस्ती करत रोमँटिक डान्सही केला. त्यांचा एक डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही ‘आशिकी 2’मधील ‘तुम ही हो’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. दमदार परफॉर्मन्समध्ये दोघांनीही एकमेकांना लिपलॉक केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.
लूकबद्दल बोलायचे झाले तर एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तेजस्वी डेनिम लूकमध्ये दिसली. तिने काळ्या जीन्ससह एक जबरदस्त स्ट्रॅपलेस टॉप घातला होता. मोकळ्या केसांमध्ये आणि न्यूड मेकअपमध्ये ती नेहमीसारखीच हॉट दिसत होती. त्याचवेळी करण कुंद्राही ब्लॅक लूकमध्ये दिसत होता.
करण आणि तेजस्वीच्या प्रेमाची सुरुवात ‘बिग बॉस 15’मध्ये झाली होती. शोमधील त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून अनेकांनी हे सारं काही शोसाठी असल्याची टीकाही त्यांच्यावर केली होती. मात्र, शो संपल्यानंतरही त्यांचं प्रेम, त्यांची केमिस्ट्री पाहून ते खरंच प्रेमात असल्याची खात्री लोकांना पटली. चाहते त्याला प्रेमाने तेजरन म्हणतात. चाहत्यांना लवकरच या दोघांना लग्नबंधनात अडकल्याचं पाहायचं आहे.