नव्वदच्या दशकापासून आतापर्यंत तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री करिज्मा कपूरचा क्रेझ आजही तितकाच आहे. ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत नेहमी जोडलेली असते. ती आणि तसेच करीना कपूर-खान हिचे कुटुंबीय नेहमी माध्यमांच्या नजरेत येत असतात. आजही करिश्मा कपूर सोशल मीडियावर आपल्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. तिच्या आत्ये भावाचं लग्न होतं. त्याच्या लग्नातल्या मेहंदीच्या कार्यक्रमातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Karisma-Kareena's Sibling Love To Ranbir Kapoor's Perfect Pout
अभिनेत्री करिज्मा कपूर हिला कोणत्या विशेष ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये करिज्माने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करिश्माच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. करिज्माने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पिंक ड्रेसमधील स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पिंक कलरचा ड्रेस, ओढणी आणि ऑक्साईड दागिने वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले. अभिनेत्रीने एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस देत खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. तिच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
अभिनेत्रीने आपल्या नातेवाईकांसोबत मेहेंदी इव्हेंटमध्ये जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत. अभिनेत्रीने करीना आणि रणबीरसोबतही फोटो शेअर केला आहे. त्यांनी हातावर मेहंदी काढलेला फोटो शेअर केला आहे.
करिज्माने शेअर केलेल्या फोटोंना 'मेहंदी' असं कॅप्शन देत हे सर्व सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने आपल्या नातेवाईकांसोबतही फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये सर्वांनी रंगी बेरंगी कपडे वेअर करत कार्यक्रमाची शोभा वाढवलीये.
दरम्यान, करिज्माने शेअर केलेल्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.