The Kapil Sharma Show : ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. मध्यंतरी कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) या शोमध्ये पुनरागमन करू शकतो अशा बातम्या येत होत्या. आणि आता हे खरं होताना दिसत आहे. निर्मात्यांनी अलीकडेच शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये कृष्णा अभिषेक सपनाच्या भूमिकेत दिसत आहे. कपिलच्या शोमध्ये कृष्णाला पुन्हा पाहायला मिळाल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रोमोचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) शेअर करण्यात आला आहे.
यूजर्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. प्रोमोमध्ये, कृष्णा सपनाच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि म्हणतो की, “कप्पू मी तुला सांगू शकत नाही की मी पुन्हा परत आल्याने किती आनंदी आहे. आता मी परत आलो आहे, सिद्धूजीही परत येतील. हळूहळू सगळे जुने लोक परत येतील.”
कृष्णाने अर्चना पूरण सिंहवर हा विनोद केला. सपनाच्या या विनोदाचा खरपूस समाचार घेत कॉमेडियन राजीव ठाकूर म्हणलाय, “जास्त आनंदी होऊ नका. सगळे जुने परत आले तर तुला जावं लागेल. यानंतर सुमोना, कृष्णा आणि अर्चना जोरजोरात हसायला लागतात. राजीव यांच्या या वक्तव्यानंतर यूजर्स सातत्याने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, सुनील ग्रोवर आणि अली असगरही येत आहेत का?. आणखी एका यूजरने लिहिले, सुनील ग्रोवरलाही घेऊन या. तिसर्या यूजरने लिहिले, गुत्थीही परत येईल का?
कृष्णाने या सीझनच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, पेमेंटमुळे तो या शोचा भाग होणार नाही. मात्र आता निर्माते आणि कृष्णा यांच्यातील सर्व वाद मिटले आहेत. कृष्णाच्या पुनरागमनाने चाहते खूप खूश आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर द कपिल शर्मा शो यावर्षी जून महिन्यात बंद होणार आहे. यामागे कपिल शर्माचा दौरा कारण असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कपिलच्या टीमलाही काही काळ विश्रांतीची गरज आहे, जेणेकरून नवीन सीझनची धमाकेदार सुरुवात करता येईल असंही म्हटलं जात आहे.