फोटो सौजन्य सोशल मिडिया
Gondhal Oscars : गेल्या वर्षी धुरंधर हा सिनेमा प्रचंड प्रमाणात गाजला होता. या चित्रपटाला कथा होती या मुळे धुरंदर हा चित्रपट ऑस्करला धडक देईल, काल ‘गोंधळ’ या मराठी सिनेमाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘गोंधळ’ सिनेमाने चक्क ऑस्करपर्यंत मजल मारल्याचे पाहण्यास मिळाले. या साठी ‘ गोंधळ ‘ चित्रपटाचे दिगदर्शक संतोष डावखर यांना मानावे लागेल. आपल्या महाराष्ट्राची लोकपरंमपरा आणि सांस्कृतीक आणि सामाजिक जिवनाचे नाते सांगणारा हा चित्रपट आहे. याचे कौतुक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मिडिया ट्विटर अकांऊट द्वारे त्यांनी ‘ गोंधळ ‘ या मराठी चित्रपटाला आँस्कर साठी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या तर दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्करसाठी 2027 च्या भारताच्या अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली असून, महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेशी आणि संस्कृतीशी नाते सांगणारा हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ‘गोंधळ’च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही कथा जागतिक स्तरावर नवी उंची गाठली आहे
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! 🎬 दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली असून, महाराष्ट्राच्या समृद्ध… pic.twitter.com/1KEdqwIao7 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 18, 2026
Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक श्रीमंती आपल्या चित्रपटाच्या कथानकामध्ये यावा हा हेतू ‘गोंधळ’ चित्रपटाच्या दिगदर्शक संतोष डाववखर यांचा हा हेतू होता. तर आपल्या भारताला एक श्रीमंत आणि अभिमानास्पद संस्कृती लाभली आहे, पण सिनेमाच्या माध्यमातून संस्कृतीच प्रतिनिधीत्व सादर करायचं होतं असं संतोष डावखर म्हणाले, ‘गोंधळ’ हा चित्रपट संतोष डावखर यांनी स्वता लिहला असून तो दिग्दर्शित सुद्धा केला आहे , या मध्ये मानशास्त्रीय आणि सांस्कृतिक थरार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा सुमन नावाच्या नवविवाहित तरुणीभोवती आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक धार्मिक-सांस्कृतिक विधी असणाऱ्या ‘गोंधळ’ या पार्श्वभूमीवर फिरते. सुमनचे लग्न आनंदसोबत झालेले असते. परंतु लग्नानंतर तिच्या आयुष्यात एक अनपेक्षित आणि दुःखद वळण येते, चित्रपटात मानवी मनातील भीती, अस्वस्थता, मानसिक संघर्ष, आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. पारंपरिक ‘गोंधळ’ विधीचा वापर केवळ देखावा म्हणून न करता कथेच्या आशयाशी आणि भावनांशी जोडला गेला आहे.






