सांस्कृतिक संचालनालय आयोजित ‘महाराष्ट्र राज्य हौशी अंतिम नाट्य स्पर्धा’ आणि व्यावसायिक नाटकांच्या ३५ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल लागला असून, त्या निकालाबाबत विरोधी प्रतिक्रिया व्यावसायिक आणि हौशी रंगभूमीवर उमटताना दिसत आहेत. या विरोधी सुरांवर सांस्कृतिक संचालक विभीषण चावरे किती लक्ष कधी घालतील ? याकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत. जर असे निकाल लागत राहिले तर स्पर्धकांचा त्या-त्या स्पर्धेबद्दलचा विश्वास हा उडून जाईल, अशा ही प्रतिक्रिया उमटत आहे.
व्यावसायिक नाटकांच्या प्राथमिक फेरीचा सुद्धा धक्कादायक निकाल लागला आहे, आहे अशी प्रतिक्रिया निर्मात्यांकडून येत आहे. त्यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडून उत्तर अपेक्षित असूनही त्याबाबत त्यांनी मौन पाळले की काय अशी चर्चा व्यावसायिक नाट्य वर्तुळात उमटली आहे. महाराष्ट्र राज्य स्पर्धेच्या नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रंगशारदा नाट्यगृहात नुकतीच पार पडली. शकुंतला नरे, शिवदास घोडके, संजय पेंडसे, रवींद्र आवटी आणि प्रदीप वैद्य हे परीक्षक मंडळ होते. महाराष्ट्राच्या सर्व केंद्रातून पहिल्या आणि दुसऱ्या विजेत्या नाटकात अंतिम फेरी ही घेतली गेली. सादर झालेल्या नाटकांच्या निकालात काही दोन-तीन नाटकांचा प्रयोग लक्षणीय होऊनसुद्धा पारितोषिकांसाठी त्यांची वर्णी लागली. सुशील इनामदार यांच्या ‘इंशानअल्ला’ हे नाटक नंबरात कसे आले नाही, याबाबत हौशी वर्तुळत चर्चा होताना दिसली.
…. तर नाटकाची प्रवेशिका घेतली कशी?
स्पर्धकांनी परीक्षकांशी संपर्क साधला असता, त्यांना त्याची उत्तर ही देता आली नाहीत, असे स्पर्धकांनी सांगितले. सुशील इनामदार हा व्यावसायिक नट आहे, असे त्याला एका परीक्षकाने स्पष्टीकरण दिले, असे बोलले जात आहे. तसे असेल तर त्याच्या नाटकाची प्रवेशिका घेतली कशी, असा सवाल स्पर्धकांनी केला आहे.
स्पर्धेत एकूण २३ नाटके सादर
चुका सांस्कृतिक खात्याने करायच्या आणि निकालावर बोंबाबोंब झाली की खापर परीक्षकांवर फोडायचे, असाच बहुदा पवित्रा सांस्कृतिक खाते घेत असावे. व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या बाबतीत तसेच घडल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत एकूण २३ नाटके सादर झाली. नाटकांची नावे सांस्कृतिक संचालनालयाकडे मागून सुद्धा ती मिळालेली नाही, ही खेदजनक बाब आहे.
Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?
अंतिम फेरीसाठी झाली आहे दहा नाटकांची निवड
मास्टर माइंड, थेट तुमच्या घरातून, ज्याची त्याची लव्हस्टोरी, असेन मी नसेन मी, शिकायला गेलो. एक वरवरचे वधूवर, उर्मिलायन, गोष्ट संयुक्त मानापमानाची, नकळतं सारे घडले, सूर्याची पिल्ले या १० नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहेत. त्या दहामध्ये ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ आणि ‘पुरुष’ या नाटकांची निवड होऊ नये, ही खेदजनक बाब आहे, असे निर्माते मंडळी म्हणताना दिसत आहेत. यात थोड्याफार प्रमाणात तथ्य आहे. डॉ. अनिल बांदिवडेकर, पंढरीनाथ कांबळी आणि भार्गवी चिरमुले हे व्यावसायिक राज्यस्पचेंचे परीक्षक होते. असा निकाल स्पर्धेचा का लागतो, तो हा स्पर्धकांना पडलेला प्रश्न आहे. निकाल घोषित झाल्यानंतर स्पर्धक आणि परीक्षक मंडळ यांचा समन्वय सांस्कृतिक संचालनालयाने घडवून आणला पाहिजे. परीक्षकांनी त्यासाठी वेळ देणे उचित ठरेल. स्पर्धकांच्या नाटकांवरची टिप्पणी परीक्षकांनी त्यांना दिली पाहिजे.