(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या वडिलांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. प्रार्थनाच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तिने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करुन तिचे दु:ख व्यक्त केले आहे. प्रार्थनाच्या वडिलांचा
१४ ऑक्टोबर २०२५ रोजी अपघाती मृत्यू झाला आहे.
प्रार्थनाने सोशल मीडियावर वडिलांचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले: “तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खूप दुखावलो आहोत.”
यापूर्वी काही दिवसांपूर्वी प्रार्थनेची जवळची मैत्रीण प्रिया मराठे कॅन्सरमुळे गमावली होती. आता तिने वडिलांना गमावलं आहे. प्रार्थनाने वडिलांचा एक फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.
‘मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही’; बॉलीवूडच्या दबंगबद्दल असं का म्हणाले महेश मांजरेकर ?
तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “मर के भी किसी को याद आएंगे
किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है “
माझे बाबा …. ❤️
१४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका road अपघातात झाले”
बाबा ……. तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय ,
तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो.
तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं.
तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे.
आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात
तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे.
पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय.
तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे.
डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे.
काळजी करू नका… मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे.
I LOVE YOU BABA , MISS YOU FOREVER
Hansraj Raghuwanshi Death Threat :प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला जीवे मारण्याची धमकी, 15 लाखांची केली मागणी
अशी भावनिक पोस्ट प्रार्थनाने केली आहे. प्रार्थना बेहेरेच्या या पोस्टवर प्रसाद जवादे, अन्विता फलटणकर, अमृता खानविलकर, पुष्कर जोग, वैभव तत्ववादी, भूषण पाटील यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त करुन तिचे सांत्वन केले आहे.






