गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सेलिब्रिटींनी नवीन आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहेत. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. आता याचदरम्यान आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री तेजश्री जाधव लवकरच रोहन सिंगसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्यांनी प्री वेडिंग शूट केले आहे. समुद्रकिनारी शूट करण्यात आलेल्या या क्यूट कपलच्या फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तेजश्री जाधव सुरु आहे लगीन घाई; समुद्रकिनारी केले होणाऱ्या नवऱ्यासह रोमँटिक प्री-वेडिंग शूट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी अभिनेत्री तेजश्री जाधवच्या अनेक दिवसांपासून लग्नाची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री आता लवकरच लग्नबंधणार अडकणार आहे.
तेजश्रीने नुकतेच तिचे लग्नाआधीचे प्री-वेडिंग शूट केले आहे ज्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी अभिनेत्री तेजश्रीने हे प्री-वेडिंग शूट तिचा होणार नवरा रोहन सिंगसोबत समुद्रकिनारी केले आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
तेजश्री आणि रोहनच्या रोमँटिक फोटोने चाहत्यांचे मन जिंकले आहे. हे फोटो पाहून चाहते त्यांना भरभरून प्रतिसाद आणि अभिनंदन करत आहेत.
तेजश्री या प्री-वेडिंग शूटमध्ये सुंदर ड्रेस परिधान केला आहे. याचसह तिचा नवरा रोहनने तिला मॅचिंग शर्ट घातला आहे. हे दोघेही फोटोमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
अभिनेत्री तेजश्री जाधवने नुकतेच तिचे केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता तिचे प्री-वेडिंग शूटचे फोटो चर्चेत आहेत.