(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील चला हवा येऊ द्या नवीन पर्व यंदा 26 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या कार्यक्रमाचं नव्या संकल्पनेसह आणि काही जुन्या-नव्या कलाकारांच्या सहभागामुळे या पर्वाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र अवघ्या ५ महिन्यांच्या आतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
दर शनिवार आणि रविवारी प्रसारित होणारा हा शो आता बंद झाल्यामुळे झी मराठीच्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी आता ‘तारिणी’ आणि ‘देवमाणूस’ या दोन्ही मालिका आठवड्याचे सातही दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कार्यक्रम संपताना शोचा होस्ट अभिनेता अभिजीत खांडकेकर याने भावनिक शब्दांत प्रेक्षकांशी संवाद साधला.
अभिजीत म्हणाला, “मंडळी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमावर तुम्ही भरभरून प्रेम केलंत. आता काही काळासाठी हे प्रेम मनात ठेवून आम्ही तुमचा निरोप घेत आहोत. पण, निरोप जरी घेत असलो तरी त्यामध्ये ‘रोप’ आहे. या रोपाला आम्ही मायेचं खतपाणी घालत राहूच. सध्या आम्ही या कार्यक्रमामध्ये पूर्णविराम घेतोय पण, पूर्णविरामानंतरच नवं वाक्य सुरू होतं, त्यामुळे लवकरच भेटूया नव्या रुपात…नव्या ढंगात असंच प्रेम राहूद्या. पाहात राहा तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या!”
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर झी मराठीवर एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रोमोमध्ये लोक लोकप्रिय कलाकार पाठमोरे उभे आहेत. खबर आहे पक्की, COMEBACK होणार नक्की लवकरच… असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. या प्रोमोच्या आवाजावरून हे दोघं निलेश साबळे आणि भाऊ कदम असल्याचा अंदाज आता प्रेक्षकांनी लावायला सुरूवात केली आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, भाऊ कदम झिंदाबाद”, ”आता राडा होणार पोरं नाय ऐकणार..” ,”भाऊ परत आला,” हे नक्कीच निलेश साबळे आणि भाऊ कदम आहेत” अश्या अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.
धरमजींच्या आठवणीत री- रिलीज होणार Yamla Pagla Deewana; बाप- लेकांची जोडी पुन्हा पडद्यावर झळकणार
निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची झी मराठीवर एन्ट्री होणार अशी चर्चा रंगली आहे. झी मराठीवर उगाच अवॉर्ड्स हा शो प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून निलेश आणि भाऊ कमबॅक करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.






