मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच लग्न केल्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. तसेच पूजा सतत सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांसह शेअर करत असते. याचदरम्यान पूजाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोज पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती पती सिद्देश चव्हाणसोबत सुट्टीचा अनुभव घेताना दिसत आहे. सिद्देश चव्हाण आणि पूजा सावंत या दोघांचे लग्न झाल्यानंतर हे दोघेही मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडपे आहेत. तिने शेअर केलेल्या पोस्टला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री पूजा सावंत आणि पती सिद्देश चव्हाणचे पहा सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो. (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती एका सुंदर आणि आकर्षित बीचवर दिसून येत आहे. त्यात तिचे काळ्या रंगाचे टीशर्ट आणि त्यावर मोहक पांढरे जॅकेट घातले आहे. आणि डोक्यामध्ये तिने बीच हॅट घातली आहे ज्यामध्ये ती खूप डॅशिंग लुकमध्ये दिसत आहेत.
तसेच पूजाने या समुद्राचा आनंद घेत वेगवेगळ्या प्रकारात तिचे फोटो शेअर केले आहे. याचदरम्यान या फोटोमध्ये स्वच्छ आणि सुंदर आभाळदेखील ती दाखवत आहे. जे पाहून कोणालाही शांत आणि अप्रतिम वाटेल.
अभिनेत्रीने तिसरा फोटो आपल्या पतीसह शेअर केला आहे, ज्यामध्ये हे दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. तसेच या फोटो मध्ये सिद्देश चव्हाणने पांढरे टीशर्ट आणि जॅकेट घातले असून, आपल्या मोहक डोळ्यांनी पूजा त्याच्याकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे.
तसेच अभिनेत्री पूजा सावंत प्राणी प्रेमी असल्यामुळे ती या बीचवर फक्त पतीसोबत न दिसता तिचे डॉग्स देखील या बीचचा आनंद घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर तिचे त्यांच्यासोबत खूप छान छान फोटो कडून शेअर केले आहेत.
याचदरम्यान शेवटच्या फोटोमध्ये अभिनेत्रीने तिची एंगेजमेंट रिंग फ्लेक्स केली आहे, आणि या फोटोमध्ये तिचा पती सिद्देश चव्हाण तिच्या मांडीवर झोपला असून दोघेही रोमँटिक अंदाजात नजर येत आहेत.