(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनेक वर्षांपासून सोशल मीडिया सोलापूरचे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे हे नाव गाजत आहे. ‘ अंजली बाई ‘ या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून हे दोघे घराघरांत पोहोचले आहे. या दोघांचा प्रवास सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचला. परंतु आता या दोघांचा प्रवास मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आकाश नारायणकर आणि अंजली ची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जी साऊथच्या पडद्यावर झळकणार आहे.
A young couple from Solapur, Maharashtra, Akash Narayankar and Anjali Bhai Shinde, captured hearts with their adorable reels. But life took a tragic turn after marriage when Anjali met with an accident, which revealed a long hidden brain tumour. Though surgery saved her, she was… pic.twitter.com/e7z6EQWVGo — Karnataka Box Office | ಕರ್ನಾಟಕ ಬಾಕ್ಸ್ ಆಫೀಸ್ (@Kannada_BO) November 4, 2025
सोलापूरच्या आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांच्या आयुष्यात आलेल्या चढउतारांची बरीच चर्चा झाली होती. तसेच या दोघांची लव्हस्टोरी म्हणजे आजच्या काळात प्रेरणादायक असल्याचे दिसत आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीवर आता चित्रपट बनला आहे, आणि तोही साऊथ मध्ये. साऊथचे लोकप्रिय निर्माते कुमार यांनी या दोघांच्या लव्हस्टोरीवर सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘ लव्ह यू मुड्डू ‘ असे नाव त्यांनी या चित्रपटाला दिले आहे.
तसेच, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला, प्रत्येक परिक्षेला आपण आपल्या जोडीदारासोबत समोरे जातो. जोडीदारासाठी संकटात उभं राहण्याची ताकत, आपल्या पार्टनरला मृत्यूच्या दारातून खेचून आणण्याची ताकद ही फक्त खऱ्या प्रेमात असते, अशीच काहीशी लव्हस्टोरी अंजली आणि आकाश या दोघांची आहे, याच कथेवर हा सिनेमा असणार आहे. या चित्रपटामध्ये सगळे साऊथ कलाकार काम करताना दिसणार आहे. तसेच चित्रपट येत्या ७ नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
काय घडलेलं अंजली आणि नारायणच्या आयुष्यात?
अंजली आणि आकाश हे सोशल मीडियावर व्हायरल जोडीपैकी एक आहे. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, अन् ते प्रचंड लोकप्रिय झाले. सगळं काही छान सुरू असताना त्यांच्या आयुष्यात एक वादळ आले. हे वादळ होतं, ते म्हणजे अंजलीच्या आजारपणाचं. अंजलीला ब्रेन ट्यूमर असल्याचं निदान झाले. तिच्यावर मोठी सर्जरी करण्यात आली होती. नेहमी हसत खेळत असणाऱ्या अंजलीचं आयुष्यच बदललं होतं. अंजलीला एका बाजूने अर्धांगवायूचा झटका देखीला आला होता, मात्र अशा गंभीर आणि दु:खद परिस्थितीतही आकाशने अंजलीला भक्कम साथ दिली.
आकाश तिच्यासोबत रिल्स बनवू लागला. आपल्या निस्सीम, निस्वार्थी प्रेमाचं उदाहरणच त्याने या रिल्सच्या माध्यमातून जगासमोर ठेवले. प्रेमकथांच्या चित्रपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या दाक्षिणात्या सिनेमापर्यंत त्यांची ही लव्हस्टोरी पोहोचली अन् आता लवकरच या दोघांच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास 70 मिमि पडद्यावर झळकत आहे.






