(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत. नवीन वर्षात मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. सध्या चित्रपटसृष्टीत मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेत असून, यांचे नाव चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघेही ‘एप्रिल मे ९९’ चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नुकतेच नवीन टीझर रिलीज झाले आहे. हे टीझर सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केले आहे. टीझर शेअर करून त्याने मापुस्कर ब्रदर्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. आणि आता मापुस्कर ब्रदर्स यांनी चित्रपटाचे टीझर रिलीज करून प्रेक्षकांना खुश केले आहे. या चित्रपटाची कथा आणि कलाकार जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
Chhaava: हिंदीनंतर, तेलुगूमध्ये धमाका करण्यास सज्ज, ‘छावा’ने २० व्या दिवशी केली एवढी कमाई!
रोहन मापुस्कर हे एक भारतीय कास्टिंग डायरेक्टर आणि सहयोगी दिग्दर्शक आहे. जे प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. 3 इडियट्स (2009), हाफ तिकीट (2016), व्हेंटिलेटर (2016) आणि सचिन: अ बिलियन ड्रीम्स (2017) यांसारख्या चित्रपटांमध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्याच्या कामासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि आता ते लवकरच आगामी सिनेमा ‘एप्रिल मे ९९’ दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तर त्यांचे बंधू राजेश मापुस्कर हे भारतीय चित्रपट लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. त्यांच्या कुटुंबाचा सिनेमा हॉल असल्याने हे दोघेही अगदी लहान वयातच चित्रपटांच्या दुनियेत रमले आहेत. ‘फरारी की सवारी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.