(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगला हजेरी लावली आहे. ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘छावा’ द्वारे छत्रपती संभाजी महाराजांची खरी कहाणी सांगितल्याबद्दल निर्मात्यांचे कौतुक केले आहे. आणि ते म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांना ११ वेगवेगळ्या भाषा येत होत्या. ते एक कवी आणि लेखक देखील होते.” असे त्यांनी सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, “छावा चित्रपटाद्वारे भारतातील अनेक लोकांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अधिक माहिती मिळाली आहे आणि मी छावा क्रू मेंबर्स आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. त्यांनी चित्रपटात इतिहासाचे उत्तम चित्रण केले आहे. मी निर्माता, दिग्दर्शक, वितरक, अभिनेते आणि अभिनेत्रींचे आभार मानतो. अदिती तटकरे यांचे अद्भुत व्यवस्थेबद्दल आभार.” असे ते चित्रपट पाहिल्यानंतर म्हणाले आहेत.
इतिहासकारांनी खूप अन्याय केला आहे – मुख्यमंत्री
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनावर प्रकाश टाकण्यात ‘छावा’ यशस्वी झाला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “इतिहासकार लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांवर खूप अन्याय केला, परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची शौर्यगाथा, शौर्य, हुशारी, बुद्धिमत्ता, ज्ञान, त्यांच्या जीवनातील हे सर्व पैलू लोकांसमोर येत आहेत.” असे ते म्हंटले आहेत.
ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्याचे सतत रक्षण केले, त्याचप्रमाणे त्यांचे बलिदान या चित्रपटाद्वारे लोकांसमोर येत आहे. मी या चित्रपटाच्या निर्मात्यांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छितो.” असे त्यांनी सांगितले. चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. तसेच तो लवकरच ५०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
‘रात्र म्हणते… तू आहेस तर चंद्राची काय गरज?’ शिल्पा शेट्टीचा मनमोहक लुक
‘छावा’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत, रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत, अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहितेंच्या भूमिकेत, दिव्या दत्ता सोयराबाईंच्या भूमिकेत, डायना पेंटी झीनत-उन-निसा बेगमच्या भूमिकेत आणि नील भूपालम प्रिन्स अकबरच्या भूमिकेत आहेत.