एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार (फोटो- सोशल मीडिया)
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी पुणे श्रमिक पत्रकार संघात झाली. या बैठकीस अॅड. आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला माघार घ्यावी लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पॉवर आणि किमया काय आहे, हे पुन्हा दाखवून दिले आहे. त्यामुळे ते पुढील महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री दिसतील. शरद पवार हे चाणक्य आहेत, यात दुमत नाही. शरद पवार व एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
वेगळ्या विदर्भाचा मुद्द अचानक चर्चेत आल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, महाराष्ट्रात ऊस आणि कापूस ही दोन महत्वाची पिके आहेत. कापसाला योग्य भाव नाही. राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री विदर्भातील आहेत, तरीही कापसाच्या भावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपने मन मोठे करून विरोधी पक्षनेते करणे गरजेचे
विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी लागणारी सदस्य संख्या विरोधी पक्षांकडे नाही. सत्ताधारी भाजपने मन मोठे करून, राजकीय नैतिकता दाखवत विरोधी पक्षांपैकी मोठ्या पक्षाला विधानसभा व विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पद द्यायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही. कारण भाजपला सर्वच पक्ष संपवायचे आहेत, असेही अॅड. आंबेडकर यांनी नमूद केले.
भाजप सोडून सर्वांशी युती व आघाडी
राज्यातील नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत वंचितने भाजप सोडून विविध राजकीय पक्षांसोबत युती व आघाडी केली आहे. त्यानुसार महापालिका निवडणुकाही वंचित युती किवा आघाडी च्या माध्यमातूनच लढणार आहे. खेळ आता सुरू झाला आहे, यापुढे काय होते, हे पासून आम्ही राजकीय भूमिका घेऊ. राज्यासाठी एकच धोरण ठरवता येणार नाही. त्यामुळे भाजप सोडून सर्व, डावे उजवे पक्ष आम्हाला चालतील, असेही अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.






