"माझ्या संघर्षाची परतफेड मिळतेय...", अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या हाताला फॅक्चर असतानाही मिथुन स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती भावूक झाले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात मिथुन दा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. मिथुन दा यांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हे देखील वाचा – सूरज चव्हाणचा “झापुक झूपूक” सिनेमा केव्हा येणार? केदार शिंदे यांनी केली मोठी घोषणा !
ते म्हणाले, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, सध्या तरी मी देवाचे आभार मानतोय. मी जो संघर्ष केला, त्या संघर्षाची परतफेड मला देव करत आहे. संघर्षाची परतफेड मी पुरस्कारांच्या माध्यमातून स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. ” इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मिथुन दा म्हणाले, “मला स्ट्रगलच्या दिवसांत पैश्यांची फार गरज होती. कारण, माझं कुटुंब होतं, त्यांचा उदरनिर्वाह माझ्या पगारातूनच व्हायचा. त्यामुळे मला त्या काळात पैशांची फार आवश्यकता होती. पण आता वेळ बदलली आहे. ज्या गोष्टींनी मला फार त्रास दिला आणि डोळ्यात पाणी आणलं, मी त्या गोष्टींचा विचार करत नाही.” मिथुन चक्रवर्ती यांना एप्रिल महिन्यातच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
#WATCH | Veteran actor Mithun Chakraborty receives the Dadasaheb Phalke Award at a ceremony in Delhi
(Video source: DD News/YouTube) pic.twitter.com/jWVRUIILyr
— ANI (@ANI) October 8, 2024
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकात्यातील एका सामान्य बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन दा यांचा जन्म झाला. पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. मिथुन चक्रवर्ती यांनी मृणाल सेन दिग्दर्शित ‘मृग्या’ सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं ‘डिस्को डान्सर’ या सिनेमात मिथुन यांनी केलेला अभिनय आणि डान्स चांगलाच गाजला. या सिनेमातून ‘डिस्को डान्सर’ नावाने मिथुन यांना ओळखलं जाऊ लागलं. मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवलंय. सध्या ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहेत. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.