फोटो सौजन्य - Social media
बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा तर सगळ्यांचेच परिचयाचे आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत तसेच बॉलीवूडमध्ये सध्या गाजत असलेला राजकुमार राव या दोन्ही अभिनेत्यांना आपल्या सिनेमातून बी टाऊनचा अविभाज्य भाग बनवणारे दिग्दर्शक म्हणजेच मुकेश छाबरा आहेत. बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमांचे कास्टिंग दिग्दर्शन मुकेश छाबरा यांनी केले आहे.
हल्लीच पार पडलेल्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या संघर्षाबद्दल नमूद केले आहे. याविषयी सांगत असताना त्यांनी इंडस्ट्रीतील एका दिग्गज अभिनेत्याचे विशेष नाव घेतले आहे. त्यांच्या संघर्षमयी प्रवासात सुरवातीच्या काळात कसा हा इंडस्ट्रीतील कलावंत उपयोगी पडला आणि आज मुकेश यांच्या यशामागे त्या कलावंतांचा किती मोठा हात आहे, या बद्दल त्यांनी सांगितले.
पॉडकास्टवर सांगत असताना मुकेश म्हणाले कि सुनील शेट्टींनी त्यांना ऑफिस सेट करण्यात मदत केली होती. मुकेशने सांगितले कि, जेव्हा ते सुनील शेट्टी यांची कन्या आथिया शेट्टीबरोबर २०१५ साली प्रदर्शित झालेल्या फिल्म हिरो मध्ये काम करत होते. तेव्हा सुनील शेट्टी यांनी त्यांचे छोटेसे ऑफिस पाहिले. तेव्हा सुनील शेट्टी यांनी मुकेश यांना प्रश्न केला कि,”मुकेश तू इतक्या छोट्या ऑफिसमध्ये का काम करत आहेस?” तेव्हा त्यांनी मुकेश यांना त्यांचा वर्सोवाचा बंगला ऑफिस म्हणून वापरायला दिला. विशेष म्हणजे सुनील शेट्टींनी भाड्याची काळजी करू नकोस फक्त चांगली काम करत राहण्याचे आवाहन मुकेश छाबरा यांना दिले.
सुरवातीच्या काळात सुनील शेट्टींनी दिलेल्या बंगल्यात मुकेश यांनी त्यांची सुरवात केली. यांनतर आज मुकेश छाबरा यांचे लंडन, दिल्ली, चंदिगढ येथे स्वतःचे ऑफिस आहेत. मुकेश छाबरा नेहमी सुनील शेट्टी यांचे आभारी असल्याचे मुकेश यांनी सांगितले.