सोनाक्षी सिन्हा भडकल्यावर मुकेश खन्ना यांचं स्पष्टीकरण; माफी मागत म्हणाले, "असं परत घडणार नाही..."
मुकेश खन्ना यांनी अलीकडेच शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सोनाक्षी सिन्हाला रामायणासारख्या महाकाव्यांचे शिक्षण न दिल्याचा आरोप केला. जेव्हा ती KBC मध्ये यासंबंधित प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. अभिनेत्रीने ‘रामायण’ संबंधित एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. यावरुन ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी तिला फटकारलं होतं. शिवाय तिच्या संस्कारांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर तब्बल ६ वर्षांनी सोनाक्षीने सडेतोड उत्तर देणारी पोस्ट दोन दिवसांपूर्वी लिहिलीये. तिने मुकेश खन्नांना चांगलंच सुनावलं. आता नुकतंच मुकेश खन्नांनी सोनाक्षीच्या पोस्टवर उत्तर दिलं आहे.
सोनाक्षी सिन्हाचा रुद्रावतार, वडिलांचे संस्कार काढणाऱ्या मुकेश खन्नाला केले ‘खामोश’, धमकीवजा इशारा
मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीच्या पोस्टनंतर पोस्ट शेअर केली आणि सोनाक्षीने त्यांच्या म्हणण्यावर इतक्या उशिरा प्रतिक्रिया दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच यापुढे ते याबद्दल बोलणार नाहीत अशी हमी व्यक्त केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीवर मुकेश खन्ना म्हणतात, “प्रिय सोनाक्षी, तू KBC मध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर द्यायला एवढा वेळ घेतलास याचं मला आश्चर्य वाटतंय. मला माहितीये प्रसिद्ध शोमधील त्या एपिसोडवरुन मी तुझ्या विरोधात बोललो. पण मी सांगू इच्छितो की तुझ्या किंवा तुझ्या वडिलांच्या (जे माझे सीनिअर आहेत आणि ज्यांच्यासोबत माझा खूप छान बाँड आहे) प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा माझा उद्देश नव्हता.”
“माझ्या बोलण्याचा हेतू आजच्या पिढीवर होता ज्यांना GEN Z म्हटलं जातं. ती लोकं गूगल आणि मोबाईल फोनचे गुलाम झाले आहेत. त्यांचं ज्ञान युट्यूब आणि विकिपीडियापर्यंतच मर्यादित आहे. माझ्यासमोर HI FI सेलिब्रिटीचं म्हणजेच तुझं उदाहरण आलं ज्याचा उपयोग मी एकंदर या पिढीविषयी बोलण्यासाठी केला होता. या पिढीला उपदेश देण्यासाठी केला होता. वडील, मुलं, मुली यांना मला सांगायचं होतं की आपल्याकडे संस्कृती, परंपरा आणि एवढा इतिहास आहे जे आजच्या प्रत्येक तरुणाला माहित असलं पाहिजे. फक्त माहित नाही तर त्यांना याचा अभिमान असला पाहिजे. इतकंच. आणि हो, मी तुझं उदाहरणं माझ्या अनेक मुलाखतींमध्ये दिलं ज्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. पॉईंट नोटेड. असं परत घडणार नाही याची खात्री देतो. काळजी घे.”
सोनाक्षीने २०१९ मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचे सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम असे चार पर्याय होते. सोनाक्षीला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती. यावरूनच मुकेश खन्ना यांनी तिच्यावर टीका करत ही तिची चूक नसून तिच्या वडिलांचे संस्कार कमी पडले, असं म्हटले