'वाह ताज'ची जाहीरात अन् केस न कापण्याची शर्थ...; झाकीर हुसैन यांच्या कुरळ्या केसांमागील आहे अशी रोचक कथा
जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी केव्हाही भरून न निघणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या दोन गोष्टी भारतीयांना कायमच आयुष्यभर राहणार आहेत. त्यातील पहिली म्हणजे त्यांनी दिलेला तबल्यावरची थाप आणि दुसरी म्हणजे त्यांचे कुरळे केस. त्यांनी वडील उस्ताद अल्लाह राखा खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण कुरळ्या केसांची गोष्ट काही वेगळी आहे.
१४०० कोटींची कमाई करणारा ‘पुष्पा २’ ओटीटीवर येणार, कधी आणि कोणत्या ॲपवर होणार रिलीज
एक काळ असा होता की झाकीर हुसेन रेडिओ आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होते, पण ताजमहालच्या चहाच्या जाहिरातींनी त्यांना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. खरंतर, या जाहिरातीनेच त्यांचे कुरळे केसही प्रसिद्धीच्या झोतात आणलेत. जे त्यांची ओळख बनली आहे. ही जाहिरात प्रिमियम चहा ब्रँडची होती, जी ब्रिटीश कंपनीच्या मालकीची आहे. झाकीर हुसैन यांना एका मुलाखतीत त्यांच्या कुरळ्या केसांचे रहस्य विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्याची कथा सांगितली.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “मी केव्हाच विचार करून हेअरस्टाइल बनवली नाही. मी माझे केस असेच ठेवायचे किंवा तसेच ठेवायचे असं ठरवलं नाही. बरेचदा असं व्हायचे की अंघोळ करून बाहेर पडायचे पण एवढ्या घाईत केस सुकवायला आणि कंगवा करायलाही वेळ मिळत नव्हता. हा तो काळ होता जेव्हा अमेरिकेत हिप्पी स्टाइल खूप चर्चेत होती. लांब केस आणि लांब दाढी ठेवण्याचा ट्रेन्ड होता, पण मला ती स्टाइल फॉलो करण्यात रस नव्हता. बऱ्याच दिवसांनी ताज चहाच्या जाहिरातीबाबत चर्चा झाली. जाहिरातीच्या करारासोबत मला एक अटही घातली होती.
रॅपर बादशाहला कार चालवताना ‘ती’ चूक भोवली, भरावा लागला हजारोंचं चलन!
वाह ताजच्या जाहिरातीसाठी मला केस कापता येणार नाहीत, अशी अट मला कंपनीने घातली होती. कंपनीच्या या अटीमुळे केस न कापण्याची माझी मजबुरी बनली. मी कधीही असे केस कापले नाहीत. २००९ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले होते की, माझे केस खूप दाट होते, पण वाढत्या वयाबरोबर ते गळू लागले आहेत. मात्र, शेवटच्या कामगिरीपर्यंत माझी हेअरस्टाईल तशीच राहिली आहे. ज्या जाहिरातीसाठी झाकीर हुसेन यांनी कधीच आपली हेअरस्टाईल बदलली नाही, त्याचीही स्वतःची एक कथा आहे. त्या वेळी ताजमहाल चहाला पाश्चिमात्य कंपनीचे उत्पादन म्हणून पाहिले जात होते, त्यामुळे कंपनी तो पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत होती.
प्रॉडक्ट पुन्हा लाँच करण्यासाठी, कंपनीला एका भारतीय चेहऱ्याची गरज होती जो त्यांची मागणी पूर्ण करू शकेल. रंग, सुगंध आणि चव हे त्याचे गुण असल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी झाकीरने तबलावादक म्हणून आपला ठसा उमटवला होता, पण नंतर ज्या पद्धतीने त्यांना ओळखले गेले, तसे भारतीय त्याला ओळखत नव्हते. त्यावेळी ते अमेरिकेत राहत होते. त्यामुळे कंपनीनी त्यांची निवड केली. जाहिरातीदरम्यान ते ‘वाह ताज’ म्हणतात दिसत आहे. तबल्याच्या तालावर स्तुतीसुमने उस्ताद व्वा! असे म्हटले जाते. पण झाकीर हुसेन उत्तरतो, अरे साहेब, वाह ताज म्हणा! ही जाहिरात भारतीयांची मने जिंकते आणि अजरामर होते.