बिग बॉस संपल्यानंतरही निक्की-अरबाजचा बाँड कायम, Vacation Mood ऑन करत शेअर केले मनालीतले फोटो
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गेल्या महिन्यात संपला. सीझन संपून महिना झाला असला तरीही चाहत्यांमध्ये शोची क्रेझ कायम आहे. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या जोडीची चर्चा होते. अशातच सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची जोरदार चर्चा होत आहे. बिग बॉसच्या घरात असल्यापासून या दोघांच्याही नात्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आता ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही दोघांनी आपला बाँड कायम ठेवला आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघांचे एकत्र अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अशातच हे दोघेही वेकेशनला गेले आहेत. वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बिग बॉस शो संपल्यानंतर निक्की आणि अरबाज पहिल्यांदाच वेकेशनसाठी गेलेले आहेत. दोघांनीही इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना वेकेशनला गेल्याची माहिती दिली आहे. इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर करत कपलने हिमाचल प्रदेशचं लोकेशन दाखवलेलं पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या आधीच्या इन्स्टा स्टोरीवर निक्की आणि अरबाज एकाच कारमधून एकत्र प्रवास करताना दिसत आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये सध्या हिमाचल प्रदेशात थंडी खूप आहे. तिथे थंडी खूप असल्यामुळे राहत असलेल्या रुममध्ये ते हिटर ऑन करून बसलेले पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा- “५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
निक्की- अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर नेटकऱ्यांना वाटलं होतं की यांचं नातं फार काळ काही टिकणार नाही. पण असं काही कुठे पाहायला मिळालं नाही. रिॲलिटी शोमधलं कपल रिअल लाईफमध्ये सहसा फार काळ एकत्र राहत नाही. असं अनेकदा पाहायला मिळतं. पण यांच्या बाबतीत तसं झालेलं पाहायला मिळालं नाही. निक्की- अरबाजचा बिग बॉसच्या घरात कायम राहिलेलं बॉण्ड शो संपल्यानंतरही तसंच राहिलेलं आहे. कायमच दोघेही इन्स्टाग्रामवर रोमँटिक अंदाजात फोटोज् शेअर करत असतात. “माझ्या आयुष्यात अरबाज खूप खास आहे, आमच्यात खूप चांगला बॉण्ड आहे” असं निक्की अनेक मुलाखतींमध्ये म्हणाली आहे.