• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Ranpati Shivray Swari Agra Movie Trailer Is Being Well Received By Audience

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!

'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, हा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 22, 2026 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा
  • चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस
  • ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ कधी होणार प्रदर्शित
 
छत्रपती शिवराय केवळ धैर्य आणि नेतृत्वामुळे नव्हे, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्ता, अद्वितीय रणनीती आणि विचारसरणी यामुळे सदैव आपल्या स्मरणात आहेत. असामान्य नियोजन कौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना धूळ चारली. औरंगजेबासारख्या शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज पुरून उरले. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही एक जोखमीची घटना होती. पण या भेटीतून त्यांच्या कणखर नेतृत्वाची खरी झलक दिसली. हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला, निमित्त होते…‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्याचे. शिववंदना, शिवशाहिरांकडून सादर झालेल्या दमदार पोवाडा सादरीकरणाने हा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला होता.

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटाच्या विस्तारणाऱ्या कक्षेसोबत त्याच्या मार्केटिंग आणि प्रसिद्धीच्या संकल्पनाही कमालीच्या विस्तारत आहेत. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासात दडलेले सुपरहिरोज AI आधारित चॅटबॉटच्या मदतीने आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. या ट्रेलर अनावरण प्रसंगी महाराजांचा ‘तिसरा डोळा’ अशी ख्याती असणाऱ्या बहिर्जी नाईक यांच्या व्यक्तिरेखेच्या चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाच्या निमित्तानं झालेला हा प्रयत्न जो मराठी सिनेसृष्टीसोबतच शिवप्रेमी रसिकांसाठीसुद्धा अभिमानास्पद आहे. हे चॅटबॉट युजरने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विविध भाषेत अवघ्या काही सेकंदात देते.

औरंगजेबासारखा अत्यंत दगाबाज, कपटी बादशहा, सर्वत्र कडेकोट पहारा आणि आजूबाजूला निराशेचा अंधार अशा मोठ्या बिकट अवस्थेत शिवाजी महाराजांची आग्रा भेट झाली होती. माणसांची उत्तम पारख असणारे, दूरदृष्टी आणि राजकीय जाण असणाऱ्या महाराजांनी या सगळ्या गोष्टी कशा हाताळल्या आणि ही स्वारी कशी यशस्वी केली याची झलक या ट्रेलर मध्ये पहायला मिळते आहे. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असणार आहे, असा विश्वास लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला. शिवकाळातलं एक सुंदर आणि तेजस्वी पान उलगडण्याचा प्रयत्न आम्ही केला असून हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांची मेहनत लक्षात येईलच. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात यशस्वी नक्की होईल अशी खात्री निर्मात्यांनी व्यक्त केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू चित्रपटातील कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.

Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो

‘पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र, समीर धर्माधिकारी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर, स्मिता शेवाळे, पुनीत इस्सार, विराजस कुलकर्णी, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, योगेश सोमण, अक्षय वाघमारे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, नुपूर दैठणकर, सचिन देशपांडे, अमिषा ठाकूर, अभिलाष चौधरी, अयन कर्णे, अमित देशमुख, अभ्यंग कुवळेकर, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, भूषण शिवतारे, संकेत ओक हे सगळे तगडे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Web Title: Ranpati shivray swari agra movie trailer is being well received by audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित
1

अभि आणि कृतिकाची लगीनघाई! ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?
2

Oscars 2026 Nomination: ९८ व्या अकादमी पुरस्कारांची आज घोषणा; जाणून घ्या कोणता भारतीय चित्रपट शर्यतीत?

तुम्ही कधीही न पाहिलेल्या भूमिकांमध्ये झळकणार आदिनाथ कोठारे, ‘या’  बिग बजेट प्रोजेक्ट्समधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3

तुम्ही कधीही न पाहिलेल्या भूमिकांमध्ये झळकणार आदिनाथ कोठारे, ‘या’ बिग बजेट प्रोजेक्ट्समधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!
4

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ टीमकडून ‘छत्रपतींना’ मानाचा मुजरा; चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस!

Jan 22, 2026 | 12:49 PM
‘अप्सरा आली…’, गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थीनींसोबत धरला ताल, VIDEO VIRAL

‘अप्सरा आली…’, गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थीनींसोबत धरला ताल, VIDEO VIRAL

Jan 22, 2026 | 12:47 PM
Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो

Bigg Boss Marathi 6 : घरात वादाचा भडका! राकेश आणि अनुश्री यांच्यात पुन्हा जुंपली; भांडणात कोणाची बोलती होणार बंद? पाहा प्रोमो

Jan 22, 2026 | 12:40 PM
India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?

India EU Free Trade Impact: भारत–EU एफटीए अंतिम टप्प्यात; शेअर बाजारासाठी ठरणार ‘गेम-चेंजर’?

Jan 22, 2026 | 12:36 PM
Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

Jan 22, 2026 | 12:35 PM
Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न

Satara Crime: पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न

Jan 22, 2026 | 12:30 PM
देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

देवदूत ठरले RPF जवान! ऑपरेशन जीवन रक्षा आणि मातृशक्ती अंतर्गत वाचवला प्रवाशाचा जीव, धावत्या ट्रेनमध्ये केली सुरक्षित प्रसूती

Jan 22, 2026 | 12:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.