रशियाची मोठी खेळी! गाझा 'Board Of Peace' साठी १ अब्ज डॉलर्स देणार, पण...; पुतिन यांनी ट्रम्पसमोर ठेवली मोठी अट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेकडे सध्या रशियाची ४ ते ५ अब्ज डॉलर्सची संपत्ती जप्त केलेली आहे. तर जगभरात सुमारे ३०० अब्ज डॉलर्स किंमतीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तर बहुतांशी संपत्ती ही युरोपध्ये अडकेलेली आहे. यामुळे पुतिन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ही संपत्ती गाझात पुनर्बांधणीसाठी, तसेच शहरांचे पुनरुज्जीवन, पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळित करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पण ही संपत्ती रशिया आणि युक्रेन मध्ये शांतता करार झाल्यानंतर वापरता येईल अशी अट रशियाने ठेवली आहे. रशियाच्या या अटीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
पुतिन यांनी हेही सांगितले की, यावर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मॉस्कोत ट्रम्पचे राजदूत स्टीव्ह वीटकॉप आणि जॅरेड कुश्नर यांच्या पुढील चर्चा होणार आहे. पुतिन यांनी पॅलेस्टिनींशी रशियाच्या असलेल्या ऐतिहासिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अमेरिकेच्या फायदाचा ठरण्याची अधिक शक्यता आहे, तर रशियावर आणकी निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
शिवाय रशिया युक्रेनमधील संघर्षाला (Russia Ukraine War) दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अद्यापही यावर शांतता करार झालेला नाही, यामुळे दोन्ही देशांत पुन्हा युद्धबंदी लागू होईल याची शक्यता अत्यंत कमी आहे. शिवाय ट्रम्प यांनी गाझात २०२७ पर्यंत मंडळ स्थापन करुन पुनर्बांधणी प्रक्रिया करायची आहे. यामुळे युद्धबंदी झाल्यानंतर गोठवलेीली संपत्ती अनेक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वापरता येणार आहे.
गाझात सध्या इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी लागू आहे. दोन्ही गटांतील युद्धबंदीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सध्या यातील दुसऱ्या टप्प्यावर चर्चा सुरु आहे. तर तिसऱ्या टप्प्यात गाझात पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीस समिती स्थापना केली आहे. ही समिती गाझात सरकार स्थापन करणे, पुनर्बांधणीची प्रक्रियी सुरु करणे आणि आर्थिक विकास सुनिश्चित करण्यावर देखरेख ठेवणार आहे.
ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…
Ans: पुतिन यांनी अमेरिकेने जप्त केलेली रशियाची संपत्ती गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वापरावी असा प्रस्ताव मांडला आहे.
Ans: पुतिन यांनी अमेरिकेने जप्त केलेली रशियाची संपत्ती गाझाच्या पुनर्बांधणीसाठी वापरावी असे म्हटले आहे, परंतु ही संपत्ती वापरण्यासाठी रशिया युक्रेनमध्ये शांतता करार आवश्यक आहे.






