इतक्या दिवसापासून ज्या क्षणाची सगळे वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) राघव चड्ढा (Raghav Chadha) सोबत लग्नगाठ बांधली आहे. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos)होत आहेत.
परिणीती चोप्रा आप नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. दोघांनी उदयपूरमध्ये या जोडप्याचे स्वप्नवत लग्न झाले. या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांना सहभाग होता. दोघांचा लग्नानंतरचा पहिला फोटोही समोर आला आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या रिसेप्शन पार्टीचा पहिला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये परिणीतीने राघवच्या नावावर सिंदूर लावला आहे. गळ्यात मंगळसूत्र, हातात गुलाबी बांगड्या आणि मेंदी दिसत आहे. काळ्या सूट-बूटमध्ये राघव खूपच सुंदर दिसत आहे.
Web Title: Parineeti chopra raghav chadha wedding photos went viral nrps